ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास बरोबरच गृहनिर्माण आणि सार्वजिनक बांधकाम (सार्वजिनक उपक्रम म्हणजे एमएसआरडीसी) तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क हे खाते असेल. महत्त्वाचे मानले जाणारे महसूल खाते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. शिंदेसेनेचे दादा भुसे हे राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील.

प्रताप सरनाईक यांना परिवहन, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे आकाश फुंडकर हे नवे कामगार मंत्री असतील. काही खात्यांची विभागणी ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्धविकास अशा काही खात्यांची विभागणी करण्यात आली. गृहखात्याचे महत्त्वाचे राज्यमंत्रिपद भाजपच्या माधुरी मिसाळ (शहरे) व पंकज भोयर (ग्रामीण) यांना मिळाले. शिंदेसेनेचे शंभूराज देसाई यांच्याकडील महत्त्वाचे उत्पादन शुल्क खाते अजित पवारांकडे गेले. त्यांना पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण ही खाती मिळाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button