Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे नाविन्यपूर्ण प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि विविध महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे शहराच्या शाश्वत विकासामध्ये लक्षणीय प्रगती झाली असून त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास देखील मदत झाली आहे.  अशाच सर्वसमावेशक लोककल्याणकारी धोरणांचा अवलंब करून अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड म्हणाल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेचे  विविध प्रकल्प, उपक्रम आदी ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड (आयएएस) यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीस भेट देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उप आयुक्त…

Read More

रेल्वे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांसाठीही २४ तास खुले राहणार रेस्टॉरंट दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते रेस्टॉरंटचे उदघाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – केंद्रीय रेल्वे बोर्डच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन याठिकाणी ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या रेस्टॉरंटची पहिली शाखा मुंबई याठिकाणी आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले असल्याने ज्याला बोगी वोगी, असे नाव देण्यात आले आहे. या ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंटचे उदघाटन शुक्रवारी (दि. २० डिसेंबर) प्रसिद्ध सिने दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, सिने अभिनेते अजय पुरकर आणि गायक अवधूत गांधी यांच्या हस्ते संपन्न झाले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवीन वर्षांच्या आगमनाची व डिसेंबर महिन्यातील शेवटच्या सप्ताहात येणाऱ्या नाताळ सणाची लगबग दापोडी येथील विनियार्ड वर्कर्स चर्चमध्ये सुरू आहे. ‘विनियार्ड वर्कर्स’ चर्चचा परिसर प्रकाशमय झालेला असून, प्रार्थना आणि कॅरोल्सच्या सूरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले आहे. या तयारीविषयी चर्चचे संस्थापक बिशप पीटर सिलवे आणि पास्टर जयश्री सिलवे यांनी माहिती देताना सांगितले, की नाताळच्या पूर्व संध्येला २४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते मध्यरात्री १२, तसेच ख्रिस्त जन्मोत्सव २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ आणि मध्यरात्रीची प्रार्थना ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १२, तर नव-वर्षाची प्रार्थना सभा १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी एकूण ५३ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयात करण्यात येते. त्यानुसार आज महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी महापालिकेच्या नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ५३ तक्रारवजा सूचना मांडल्या. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १५, ५, ७, ५, ५, ७, १  आणि ८ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये अनाधिकृत बांधकामांवर कारवाई…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे. केलेल्या जाहीर आवाहनात म्हटले आहे की,भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी,संचालक,स्विकृत संचालक,सल्लागार भोसरी एम.आय.डी.सी. S, J, T, W, ब्लॉक पिंपरी F-II, H ब्लॉक, चिंचवड D- I, D-II, D-III  हे सर्व ब्लॉक भोसरी औद्योगिक परिसरातील सेक्टर ७ आणि १०, शांतीनगर, चिखली, कुदळवाडी, तळवडे,ज्योतिबानगर, शेलारवस्ती चिखली, चोविसावाडी चऱ्होली, बारणेवस्ती मोशी   याऔद्योगिक परिसरामध्ये चोऱ्या, गुन्हे तसेच अतिरेकी /दहशतवादी कारवाया, समाज कंटकाकडून घातपाती कृत्ये घडू नये याकरिता…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भारतीय   संविधानाचा प्रचार प्रसार करणारे तसेच ज्ञान, एकात्मता आणि संसदीय लोकशाहीचे मूल्य जपणारे केंद्र म्हणून पिंपरी चिंचवड शहरात संविधान भवन उभारले जात आहे. या भवनाचा वापर आणि उपयोग सर्व घटकांना होण्यासाठी या भवनाची रचना सर्वव्यापी आणि दूरदृष्टीने तयार करावी, अशा सूचना केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील पेठ क्र. ११ मधील मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या संविधान भवनाच्या ठिकाणाची पाहणी डॉ. चंद्र शेखर कुमार यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यावेळी राज्य शासनाचे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश काळे,…

Read More

सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – नव्या उद्योजकांसह महिलांकरिता मुद्रांक शुल्क सवलत, विद्यार्थ्यांची रखडलेली ‘फेलोशिप’ दिल्याबद्दल सरकारचेचे अभिनंदन, जर्मन, फ्रेंच अशा परकीय भाषांसाठी जर्मनीसोबत करार, शिक्षण सेवकांचे रखडलेले मानधन, बिंदू नामावलीनुसार मागास प्रवर्गातील सहायक पोलीस निरीक्षकांना बढती अशा डझनभर प्रश्नांची मांडणी करीत, आमदार अमित गोरखे यांनी महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात अवघ्या सहा दिवसात तब्बल १२ प्रश्न मांडून एक रेकॉर्ड केले. पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील युवक, युवती, महिला आणि पोलिसांच्या मूळ मागण्यांवर प्रश्न मांडून त्यावरचे उपाय सुचवत आ. गोरखे यांनी सरकारचे लक्ष वेधले. आ. गोरखे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्री…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी येथील शगुन चौकात सिंधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन संत श्री आसाराम बापू यांच्या प्रेरणेतून सर्व समाजातील बांधवांना तुलशी रोपांचे वाटप केले. या मागील भावना अशी आहे दर वर्षी वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सर्व समाजातील समाज बांधव हे हा आठवडा मोठ्या उत्साहात साजरा करत असाताना अभक्ष भक्षण करतात,नशेचे पदार्थ सेवन करीत असतात पण अशा मुळे आपल्या हिंदू संस्कृतीवर टिका होत असते. त्यामुळे हि होणारी टिका टाळण्यासाठी आज तुळशीच्या रोपांचे वाटप करीत असताना तुळशी चे महत्व सांगताना तुळस ही आरोग्यवर्धक, स्मरणशक्ती वर्धक,सुख शांतीप्रदायक,प्रदुषणनाशक सौंदर्यवर्धक, असून त्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी, पुणे यांनी व्हिएतनाममधील कॅन थो युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड फार्मसीच्या सहकार्याने अवयव प्रत्यारोपण या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत या क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या व्यासपीठावरून तज्ज्ञ, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी विचारांची देवाणघेवाण केली, तसेच या क्षेत्रातील अद्ययावत माहिती, आव्हाने आणि भविष्यातील नवकल्पना यावर चर्चा केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेडिसिन विभागातील डॉ. शुभांगी कानिटकर यांनी अवयव प्रत्यारोपणाबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली.   यानंतर न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रज्वल राव यांनी परिणामकारक आणि योग्य वेळी अवयवदानासाठी मेंदूच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सोमवारी (द‍ि.२३) न‍िष्कासनाची कारवाई करण्यात आली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले. रहदारीचा व‍िचार करुन संबंध‍ितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अध‍िकारी, कर्मचारी यांनी केले. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने गत काही द‍िवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असून संबंध‍ित बांधकामे न‍िष्कास‍ित करण्यात येत आहे. सोमवारी पीएमआरडीएच्या पथकाने नवले ब्रिज भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी द‍िलीप दादा नवले, वैशाली दांगट, सारंग नवले, अतुल चाकणकर, व‍िकास नाना दांगट यांच्यासह आदींचे अनधिकृतपणे उभारलेले २५…

Read More