- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला ‘फार्मर स्ट्रीट’ उपक्रम हा नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यस्त जीवनातून वेळ काढून आरोग्याच्या दृष्टीकोनातून गांभीर्याने पाहण्यास नक्की मदत करेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिका आणि मेसर्स अर्बनली यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ४ व ५ जानेवारी रोजी पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे ‘फार्मर स्ट्रीट’ या दोन दिवसीय उपक्रमाचे आयोजन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा समारोप करतांना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील बोलत होते. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त उमेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले स्थान निर्माण करीत आहेत,त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकीकातही भर पडत असून त्यांचा गौरव करताना अभिमान वाटत असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील आरेखक संजीवनी प्रदीप मोरे यांचा मुलगा शिवदीप यांची वयाच्या २२ व्या वर्षी सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाली. सैन्यदलात रूजू होण्यापूर्वी शिवदीप यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली असता त्याच्या सत्कार प्रसंगी आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,आरेखक संजीवनी मोरे, लघुलेखक पळसकर,उपलेखापाल गीता धंगेकर, विजया कांबळे आदी उपस्थित होते. शिवराज प्रदीप मोरे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ ते रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी श्री स्वामी विवेकानंद जयंती चे अवचित्य साधून संस्कार जत्रेचे आयोजन केले आहे यामध्ये चित्रकला भगवद्गीता पाठांतर स्पर्धा हस्ताक्षर वकृत्व स्पर्धा समूहगीत वैयक्तिक नृत्य स्पर्धा मॅथ मस्ती समूह नृत्य स्पर्धा रांगोळी स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची सुरुवात प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियानाने होणार आहे ही स्पर्धा विश्वेश्वर मंदिर शाहू गार्डन जवळ बिजलीनगर चिंचवड पुणे येथे आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह साहेब आणि नवनिर्वाचित आमदार शंकर …
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील महायुती सरकार सावित्रीबाई फुले यांचे काम पुढे नेत आहे. लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत हा त्याचाच भाग आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी भुजबळ बोलत होते. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ओबीसी विकास, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे, आमदार शंकर जगताप, रूपाली चाकणकर, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनमंत माळी, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस मार्गावरील पी. के चौक येथे VUP अंडरपास पुल तयार करण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्ता कडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिकफाटा ते वाकड या बीआरटीएस मार्गावरील पी.के चौक येथे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्सेला सामोरे जावे लागत आहे, यामार्गावर हिंजवडी, वाकड, पुणे येथे कामानिमित्त जाण्यासाठी हा सोपा मार्ग असल्याने नागरिक या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणत करीत असतात तसेच जवळच असणार्या भोसरी, चाकण, खेड औधोगिक परिसरातील मोठे माल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सावकाराच्या त्रासाला कंटाळून साईबाबा नगर चिंचवड स्टेशन येथील रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या बाबत संबंधीत सावकारावर कठोर कारवाई हवी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. त्याबरोबरच शासकीय पातळीवरच रिक्षा चालकांना आधार मिळावा, यासाठी धोरण हवे, असे प्रतिपादनही बाबा कांबळे यांनी केले. पिंपरीत नुकतेच रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्महत्या केल्याची घटना माध्यमांद्वारे समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त केला. प्रसिद्धीपत्रकात कांबळे यांनी नमूद केले की, रिक्षा चालकांच्या अन्यायाला अनेक जण कारणीभूत आहेत. ओला उबेर सारख्या कंपन्या एकूण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अंधाऱ्या जीवनात ज्ञानाच्या ज्योती पेटवून स्त्रीशिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचे काम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. शिक्षण हे प्रगतीचे माध्यम असून त्याद्वारे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या आदर्शांवर चालून शिक्षणाने स्वतःला सक्षम करून समाजात समानतेचा प्रकाश पसरविण्याचे ध्येय प्रत्येक स्त्रीने अंगी बाळगले पाहिजे, असे मत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य शशिकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बलिदान बाबू गेनूचे, अवयवांची सभा, दिनूचे बील (संस्कारक्षम नाटिका), गंगी मुंबईला हरवली अशा विविध समाजप्रबोधनात्मक, आरोग्य जागरूकता आणि मुलांमध्ये संस्काराची भावना रुजविणाऱ्या नाटकांनी सजलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पिपंरी चिंचवड महानगरपालिका क्रिडा विभागाच्या वतीने २ जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान आंतरशालेय कला व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आजपासून आंतरशालेय एकांकिका स्पर्धेस सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळेगुरव येथे सुरूवात झाली. या स्पर्धेमध्ये ३ व ४ जानेवारी रोजी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहायला मिळणार असून आज झालेल्या एकांकिका स्पर्धेत भोसरी येथील श्रीराम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील महात्मा फुले वाड्यातील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष धम्मराज साळवे व पुणे शहराध्यक्ष रोहन मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पुणे शहराध्यक्ष रोहन मोहिते यांनी जयंतीनिमत्त शुभेच्छा देताना असे मत व्यक्त केले की, सावित्रीमाई यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कार्य केले आणि त्यांच्या याच संघर्षामुळे आज अनेक महिला अनेक मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत त्यामुळे आजच्या महिलांनी सावित्रीमाईंच्या कार्याची जाण ठेऊन त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. यावेळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील बालिकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा आरती राव, संस्थेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. आरती राव म्हणाल्या,…
