- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे येथे नवीन वर्षाची सुरुवात एकात्मता आणि प्रेरणादायी ऊर्जेसह माजी विद्यार्थी मेळाव्याने करण्यात आली. या मेळाव्याच्या निमित्ताने 100 हून अधिक माजी विद्यार्थी आपल्या मातृसंस्थेत परतले. एलुमनाई असोसिएशन (एमएए) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश “विकसित भारत 2047” या संकल्पनेवर आधारित होता. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्याचे उद्घाटन एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ. सुनीता कराड, प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. वीरेंद्र व्ही. शेटे, डाॅ.सुराज भोयर, प्रा. हर्षित देसाई, डॉ. संकेत बापट,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड ता. हवेली येथे नवीन तहसीलदार श जयराज देशमुख व नायब तहसीलदार डॉ. मनीषा माने-लोंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सदर ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कामकाज हे संथ गतीने चालत असल्याच्या अनेक तक्रारी वकील व सर्व सामान्य नागरिक यांच्या कडून येत असलेबाबत तक्रार पिंपरी चिंचवड अँडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान सचिव अॅड. उमेश खंदारे यांनी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांचेकडे करण्यात आली. बार असोसिएशन तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात सदर कार्यालयात एखादे प्रकरण आदेशासाठी बंद करण्यात आल्यावर सदर प्रकरणात तत्काळ आदेश पारित होणे गरजेचे असताना ५-५ महिने आदेश पारित केले जात नाहीत.…
– पिंपरी-चिंचवडसह देशाच्या सुरक्षेबाबत सरकारचे ‘नो कॉम्प्रमाईज’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगादेशींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापुढील काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल. चिखली-कुदळवाडीतील बेकायदा भंगार दुकानांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. शहर आणि देशाच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकाराने ‘कॉम्प्रमाईज’ करण्यात येणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. पिंपरी- चिंचवड शहरांमधील म्हाळुंगे, निगडी, पिंपरी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड या परिसरात बांगलादेश आणि रोहिंग्ये यांना अटक केली आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात…
तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “संतत्व हेच साहित्याचे ध्येय होय! कारण साहित्यिकांना कोणताही जातधर्म नसतो. साहित्य हाच त्यांचा धर्म असतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यगरी मोशी येथे रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, खेडचे आमदार बाबाजी काळे, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह सुनीताराजे पवार, पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समिती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे विकृत मानसिकतेचा सामना करत आपल्या विचार व भूमिकेवर ठाम राहून सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलले. सावित्रीबाईंचा हा वारसा प्रत्येक महिलेने अंगीकारायला हवा. महिला अभिव्यक्त होत असताना जाणीवपूर्वक त्यांना ट्रोल करण्याची प्रवृत्ती वाढत असून संकुचित विचारसरणी आणि पुरुषी मानसिकतेचे हे प्रतिक आहे. अशा गोष्टींना महिलांसह समाजातील प्रत्येक घटकांनी ठामपणे प्रतिकार करून आपली भूमिका परखडपणे मांडली पाहिजे, असे विचार महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांनी मांडला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “सावित्रीबाई फुले यांचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनने तीन आणि चार जानेवारीला आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शाश्वतता उद्दीष्टे चिंतन परिषदेमध्ये रिमोट केंद्र म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. एकुण १५ रिमोट केंद्रांपैकी पुण्यातून एकमेव केंद्र एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज येथे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. इंदलकर यांनी १७ शाश्वतता उद्दीष्टे आणि भारतातील त्यांची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. प्रभारी प्राचार्य आर्किटेक्ट शिल्पा पाटील यानी संशोधन टीम आणि विद्यार्थी परिषेदेच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने स्वच्छ उर्जा, शाश्वतता शहरे आणि हवामान कृती यासारख्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज व्हाट्सअप ची बाधा ही पत्रकारिते समोर एक समस्या बनली आहे. व्हाट्सअप वर आलेला प्रत्येक मेसेज प्रत्येक माहिती ही बातमी नसून ती पडताळून पाहणे गरजेचे ठरते कित्येकदा यातून समाजात चुकीचा संदेश जातो त्यामुळे व्हाट्सअप वर आलेला मजकूर हा अनेकदा पत्रकारितेत बाधा उत्पन्न करतो. काही एक दोन उदाहरणांमुळे पत्रकारांबद्दलचा समाजात आदर कमी होत नाही आजही मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचा खरा आरसा हा पत्रकारच आहे. आजच्या विविध सोशल मीडियारूपी धुक्यामुळे पत्रकारांना वेगवेगळ्या गॉगल मधून पाहण्याचे काम समाज करतो मात्र आज पत्रकारांना निरपेक्ष वास्तववादी चष्म्यातून पाहणे गरजेचे आहे, असे मत संपादिका सरिता कौशिक यांनी निगडी येथे व्यक्त केले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सव येत्या १०, ११, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे होणार असून, गायन, वादन व नृत्य अशी संपूर्णपणे कलेची अनुभूती देणाऱ्या या महोत्सवात रसिकांना सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ गायक सुधाकर चव्हाण यांनी केले आहे. किराणा घराण्याचे गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते सुरूवात झालेल्या या महोत्सवाचे हे 27 वे वर्ष आहे. येत्या १० जानेवारी रोजी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर माई ढोरे, तर स्वागताध्यक्ष…
“… जगायची असते कविता! – इंजि. शिवाजी चाळक तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “साठवायची नसते कविता तर जगायची असते कविता!” अशा मार्मिक शब्दांतून कवितेतून कवितेवर भाष्य करीत शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक – अध्यक्ष आणि ज्येष्ठ कविवर्य इंजि. शिवाजी चाळक यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवारी (दि. 5)तिसऱ्या एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात कवींचे प्रबोधन केले. निमंत्रितांच्या कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना इंजि. शिवाजी चाळक बोलत होते. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक, इंद्रायणी साहित्य संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, परिषदेचे अध्यक्ष संदीप…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अपघाताला निमंत्रण देणाऱ्या बस व ट्रॅव्हल्स बेकायदेशीर थांब्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी वाहतूक सेल विनोद वरखडे यांनी पोलीस आयुक्त, वाहतूक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी बस चालक, ट्रॅव्हल्स चालक कुठे ही आपली वाहने थांबवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी काही थांबे निश्चित केले आहेत, मात्र बस चालक व ट्रॅव्हल्स चालक प्रवासी घेण्यासाठी कुठेही थांबत आहेत, त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दैनंदिन वाहतूकदारांना त्यांचा फटका बसतो. नागरिक…
