- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– विद्युत पुरवठा, स्वच्छता गृह सुविधा तात्काळ पूर्ववत करण्याची सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अजमेरा मासुळकर काॅलनी येथील डॉ. हेडगेवार मैदान आणि परिसरातील क्रीडा संकुलांमध्ये विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. तसेच, स्वच्छता गृहाची दुरावस्ता झाली होती. याबाबत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका संबंधित विभागाचे अधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. तसेच, सदर सुविधा तात्काळ पूर्णवत करण्याची सूचना केली आहे. अजमेरा मासुळकर कॉलनी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या डॉ. हेडगेवार मैदान, स्केटिंग ग्राउंड, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल या ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला असून, स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, व्यायामास येणारी मुले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली परिसरातील शिवतेजनगर, कोयनानगर, शरदनगर, पूर्णानगर, घरकुल आदी भागातील नागरिकांसाठी असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क येथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून हे उद्यान पूर्वावस्थेत आणावे अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. या उद्यानांमध्ये दररोज हजारो नागरिक येऊन ओपन जिम आणि अन्य सुविधांचा लाभ घेतात. लहान मुले, वयस्कर नागरिक यांच्यासाठी हे उद्यान त्यांच्या दैनंदिन जीवनमानाचा अविभाज्य भाग बनले आहे. या उद्यानाच्या दुरावस्थेने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने, दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न नागरिकांना पडला असून, महापालिका प्रशासनाने या उद्यानाला गतवैभव प्राप्त करून…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या सहायक सरकारी वकिलांचा गुरुवारी (दि. ०९) पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने फुलांचे रोपटे देऊन स्वागत आणि सन्मान करण्यात आला. पिंपरी न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून ॲड. पूजा काळे, ॲड. पूजा इंगळे, ॲड. प्राजक्ता पिसाळ, ॲड. क्रांती कुरळे व ॲड. रूपाली साखरकर हे नव्याने रुजू झाले आहेत. यावेळी बोलताना, ‘सरकारी वकील म्हणून काम करीत असताना एकीकडे जनतेचा रोष, तर दुसरीकडे सरकारी उत्तरदायित्व अशी दुहेरी जबाबदारी पार पाडायची असते़. सरकारची बाजू मांडत असतानाच पीडितांना न्याय कसा मिळेल यासाठी सरकारी वकिलाने आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा असतो!’ असे मत…
संत समागम स्थळी भक्तीभावनेने प्रेरित निष्काम सेवांचा अभूतपूर्व नजारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२५ ला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात मिलिट्री डेरी फार्म, शास्त्री नगर, पिंपरी हाऊसच्या जवळ, पिंपरी, पुणे (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानावर केले जात आहे. हा विशाल आध्यात्मिक संत समागम यशस्वी करण्यासाठी २५ डिसेंबर, २०२४ रोजी विधिवत रूपात स्वैच्छिक सेवांचा शुभारंभ झालेला आहे. तेव्हापासूनच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे सदस्य, स्वयंसेवक व भाविक भक्तगण मोठ्या तन्मयतेने, निष्ठेने आणि निष्काम भावनेने समागम…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “वैदिक हिंदुधर्मात अस्पृश्यतेला कोणतेही स्थान नाही!” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी पुणे येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील तीन दिवसीय सामाजिक समरसता अभियान यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ॲड. सतिश गोरडे बोलत होते. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज केतन साळवे यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सामाजिक समरसता प्रमुख निखिल कुलकर्णी, राहुल विभूते, धनंजय गायकवाड, विजय कांबळे, हरीश वाल्मीकी, प्रथमेश परासर, अविनाश तिडके यांची प्रमुख…
आरोग्य विभागाकडून स्वच्छता जनजागृती मोहीम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग “स्वच्छतेविषयी कायम जागरूक असतो. नदी हा आपला सांस्कृतिक वारसा. याच नद्याच्या आसपास असणाऱ्या घाट परिसर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला नदीच्या पावित्र्या बरोबरचं तिथला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आपण जपणे आवश्यक असते. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून रविवार , ५ जानेवारी २०२५ रोजी, म्हातोबा मंदिर, वाकड गावठाण घाट येथे “रिव्हर प्लॉगेथॉन” स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संकलित कचऱ्याचे सेग्रीगेशन करून त्याचे वजन अंदाजे ३ ते ४…
मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्वरित मालमत्ता कराचा भरणा करण्याचे करसंकलन विभागाचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वकष सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांच्या सर्वकष सर्वेक्षणामध्ये ६४,२६० मालमत्तांची नव्याने आकारणी करण्यात आली असून, त्या मालमत्तांना मालमत्ताकराचे बिलसुध्दा बजाविणेत आले. मालमत्ता सर्वेक्षणामध्ये नव्याने आकारणी झालेल्या मालमत्तांमध्ये ६९० सोसायट्यांमधील ५६,२३२ मालमत्तांना मालमत्ताकराचे बिल बजाविणेत आले असून यामधून ६५१ सोसायटीमधील ३६९८० मालमत्ताधारकांचा ६९.५६ कोटींचा कर थकीत आहे. थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना एसएमएस,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला शहरातील सर्दी, रक्तसंचय, श्वास घेण्यात अडचण, थकवा, खोकल्याच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मास्क लावण्याची सक्ती करावी, अशी मागणी उपाध्यक्ष, आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे ॲडव्होकेट सागर रतन चरण यांनी आयुक्ताकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. पिंपरी चिंचवड शहर सुमारे २५ लाखांहून अधिक असल्याने या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने सतर्क राहण्याची गरज आहे. शहरातील सर्दी, रक्तसंचय, श्वास घेण्यात अडचण, थकवा, खोकल्याच्या रुग्णांचे आता ‘सर्वेक्षण’ पातळीने करण्यात यावे तसेच त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना देखील…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी संस्कार जत्रेचे उद्घाटन सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, विश्वेश्वर मंदिराचे सचिव अशोक पाटील, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच कामगार बंधू त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कुमारी सुप्रिया लोहार येणे गणेश वंदना सादर केली.उद्घाटनापूर्वी संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने बिजली नगर परिसरांमधून प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते या अभियानात प्रतिभा कॉलेज चिंचवड तसेच एटीएसएस कॉलेज चिंचवड आणि डॉक्टर डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांचे एनएसएसचे विद्यार्थी बहुसंख्येने यामध्ये सहभागी झाले होते. उद्घाटन झाल्यानंतर चित्रकला स्पर्धा मॅच मस्ती स्पर्धा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – १ नोव्हेंबर २००५ पुर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना (पेन्शन) लागू करण्यासह विविध विषयांस प्रशासक शेखर सिंह यांनी यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत…
