ताज्या घडामोडीपिंपरी

चिखली येथील छत्रपती शिवाजी पार्क येथील उद्यानाची झाली दुरावस्था, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिखली परिसरातील शिवतेजनगर, कोयनानगर, शरदनगर, पूर्णानगर, घरकुल आदी भागातील नागरिकांसाठी असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क येथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून हे उद्यान पूर्वावस्थेत आणावे अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

या उद्यानांमध्ये दररोज हजारो नागरिक येऊन ओपन जिम आणि अन्य सुविधांचा लाभ घेतात. लहान मुले, वयस्कर नागरिक यांच्यासाठी हे उद्यान त्यांच्या दैनंदिन जीवनमानाचा अविभाज्य भाग बनले आहे. या उद्यानाच्या दुरावस्थेने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने, दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न नागरिकांना पडला असून, महापालिका प्रशासनाने या उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांना दिसत असलेल्या समस्या महापालिका प्रशासनाला का दिसत नाहीत? गेले अनेक महिने या उद्यानाच्या अशा झालेल्या पडझडीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करतात आहे? अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. उद्यान हे नागरिकांच्या आरोग्य आणि जीवनाची संजीवनी आहे आणि ओपन जिम तसेच अन्य साहित्याची झालेली दुरावस्था यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button