ताज्या घडामोडीपिंपरी

एचएमपीव्ही व्हायरसमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मास्क लावण्याची सक्ती करावी – ॲड. सागर चरण

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला शहरातील सर्दी, रक्तसंचय, श्वास घेण्यात अडचण, थकवा, खोकल्याच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मास्क लावण्याची सक्ती करावी, अशी मागणी उपाध्यक्ष, आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे ॲडव्होकेट सागर रतन चरण यांनी आयुक्ताकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. पिंपरी चिंचवड शहर सुमारे २५ लाखांहून अधिक असल्याने या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने सतर्क राहण्याची गरज आहे. शहरातील सर्दी, रक्तसंचय, श्वास घेण्यात अडचण, थकवा, खोकल्याच्या रुग्णांचे आता ‘सर्वेक्षण’ पातळीने करण्यात यावे तसेच त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना देखील कोणता आजार नाही याची सकारात्मक भूमिका घेऊन ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या संभाव्य धोक्याबाबत सतर्कता आणि खबरदारीच्या सूचना जनतेला संवेदनशील करण्याची गरज आहे.

एचएमपीव्ही विषाणू खूप वेगाने पसरत असून या रोगामुळे अनेक भागात परिस्थिती बिकट झाली असून वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. मात्र आता भारतातही या विषाणूने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. एचएमपीव्ही हा एक मोठा आजार म्हणून समोर येऊ शकतो त्यामुळे त्याची लागण झालेले रुग्णांना क्वॉरंटाईन करा, रुग्णालयात स्वातंत्र्य वॉर्ड व सुमारे १०० खाटा राखीव ठेवण्याची गरज आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची लागणी होऊ शकते सदर बाब नाकारता येत नाही, त्यामुळे वेळेत खबरदारी घेण्याची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आजारावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे याचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये त्याचा जास्त फैलाव होऊ नये या साठी सावधगिरी व आवश्यक उपयोजनाची तातडीने वेळेत करण्यात यावी.

कोणीही संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावलं उचलत त्याला क्वारंटाइन करण्यात यावे आणि योग्य ती खबरदारी घेणे बंधनकारक करण्यात यावे. ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा संशयित रुग्ण आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावे. तसेच तीव्र श्वसन संसर्गाने ग्रस्त असतील अशा रुग्णांचे डॉक्यूमेंटेशन करणेही बंधनकारक करण्यात यावे. या व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये गरजेची असलेली औषधे असलीच पाहिजेत, त्यामध्ये ऑक्सिजन, ब्रॉन्कोडायलेटर्स, पॅरासिटीमाँ, अँटीहिस्टामाईन आणि कफ सिरपचा व इत्यादी.

तथापि, शहरात संसर्गजन्य आजाराबाबत प्रशासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यात आल्यास त्यांची स्वतंत्र नोंद ठेवावी. अशा रुग्णांची संख्या आणि त्यांची लक्षणे यावर बारकाईने लक्ष ठेवले जावे. सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे का? आणि त्यांच्यात इतर कोणती लक्षणे दिसून येत आहेत का? याची तपासणी व्हावी. तसेच, शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णाचे सर्वेक्षण करावे.

पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी असल्यामुळे विविध ठिकाणाहून नागरिक सातत्याने कामानिमित्ताने ये -जा करतात. नागपूरमध्ये या आजाराचे दोन रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शहरात कटाक्षाने खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे अशा रुग्णांची नोंद घेण्याबरोबरच एचएमपीव्हीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वात लगेच हाती घेण्याची गरज आहे अन्यथा या आजच प्रसार वाढेल. महापालिकेच्या रुग्णालयात थुंकण्यावर बंदी आणि अस्वच्छतेवर कारवाई करण्याचे फलक असतानाही योग्य ती कारवाई होत नसल्याने अस्वच्छता वाढली आहे.

तसेच, नागरिकांचे आरोग्य पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रथम कर्तव्य आहे परंतु आपल्या रुग्णालयाची अस्वच्छ अवस्था अनेकवेळा निदर्शनास आली असून रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक अस्वच्छता करतात, कुठेही थुंकणे, उपचार केलेले साहित्य फेकणे, खोकताना तोंड रुमालाने किंवा हाताने झाकून न घेणे आदींमुळे हा आजार प्रसार होऊ शकतो. प्रशासनाकडून त्या दृष्टीने हालचाली सुरू करण्याची गरज आहे. या शहरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येबाबत कोणतीही गैरसोय होणार नाही आणि शहरातील रुग्णांना सर्दी, गर्दी, श्वास घेण्यास त्रास, थकवा, खोकला या आजाराने त्रस्त असलेल्यांनी या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मास्क वापरणे सक्तीचे करावे तसेच नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी महापालिका व खासगी शाळांना सूचना देण्याची गरज आहे. आपले शहर (एचएमपीव्ही) मुक्त करण्यासाठी या संदर्भात अंमलबजावणी आणि काळजी घेण्याची नितांत गरज आहे, असे ही निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button