- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया करते आणि दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 24 ते 27 जानेवारी दरम्यान पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आयोजित करण्यात आला होता. या वर्षीचे फूल प्रदर्शनाचे उद्घाटन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवस यांच्या हस्ते शुक्रवार, 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता होईल. या पुष्प प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे जपानी शैलीत बनवलेल्या विविध फुलांच्या सजावटी, विविध प्रकारच्या फुलांच्या रचना आणि स्पर्धकांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या बोन्साय झाडे, जे पुष्पप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असतील. पत्रकार परिषदेत सुरेश पिंगळे, अनुपमा…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करुन वारस नोंद, सात-बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार असल्याने नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. 8) आयोजित जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, ई-हक्क प्रणालीमधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई-फेरफार मध्ये घेऊन (फेच करुन) फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत. ई-हक्क प्रणालीचा वापर करण्यासाठी प्रणालीच्या https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिक, सहकारी संस्था यांना वापरकर्ता नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर लॉगिन करुन…
नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध नदी घाटांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेच्या माध्यमातून १० हजार ४४५ किलो कचऱ्याचे संकलन असून शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. स्वच्छ महाराष्ट्र आणि भारत अभियान (नागरी) अंतर्गत आयुक्त शेखर सिंह मार्गदर्शनाखाली शहरातील “नदी/तळे/घाट आदी पाण्याची ठिकाणे व परिसर स्वच्छता” मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शहरातील ब,क,ड,इ,ग,ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या हदीतून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी नदीच्या…
– समाज, राष्ट्रहितासाठी विविध ठराव संमत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीने राष्ट्राच्या हितासाठी, समृद्धीसाठी एक दिवशीय संत समावेश या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मल्लिकार्जुन मंदिर, निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रा सह कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समाजातील 75 शिवाचार्य यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली तसेच समाज आणि राष्ट्र हितासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले. श्री. ष. ब्र. 108 डॉ. विरुपाक्षे शिवाचार्य स्वामीजी, मुखेड, श्री. ष. ब्र. 108 संगणबसव शिवाचार्य महायस्वामीजी, मणगुळी, कर्नाटक श्री. ष. ब्र. सिडधाराम महास्वामीजी विरक्त मठ, मसमनाळ, कर्नाटक यांच्यासह हिंदू वीरशैव लिंगायत मंच चे पदाधिकारी हेमंतराव हरहरे, अण्णाराय बिराजदार, एस.…
दिल्लीतील साहित्य संमेलनानिमित्त शरद पवार यांनी साधला साहित्यिकांशी संवाद पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे. या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यात दरवळेल. राजधानीत होणारे हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असा विश्वास ज्येष्ठ नेते आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. सध्या महाराष्ट्र संकटात आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा…
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहेत. त्यांनी निष्ठा, सामर्थ्य, आणि सेवाभावाने समाजाच्या विकासासाठी आयुष्य वेचले होते, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (शनिवारी) काढले. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाची दूरदृष्टी ठेवत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात येणाऱ्या ‘शक्तिस्थळ’ प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री आमदार डॉ.तानाजीराव सावंत, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष विजयआप्पा रेणुसे, भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, भोर…
अभिष्टचिंतन सोहळ्यास दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराचे मा.उपमहापौर आणि आरंभ सोशल फाऊंडेशनचे संस्थापक तुषार हिंगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात पार पडला. हिंगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा चिंचवड विधानसभेचे आमदार, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, मा.नगरसेवक अभिषेक बारणे, निलेश बारणे, अनुराधा गोरखे, इरफान सय्यद, बापू काटे, कैलास कुटे, फैजल शेख, केशव घोळवे, युवासेनेचे विश्वजित बारणे, विनायक रासकर आदी सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच तुषार हिंगे मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीने आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरांचा झपाट्याने होणारा विकास आणि त्यामुळे नवीन सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत आहे. अशा सोसायट्यांमध्ये मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या आयुष्याची पुंजी लावून घर विकत घेतात परंतु घर घेतेवेळी विकासकांनी दिलेली विविध आश्वासने व गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर सुनियोजनाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सोसायटीला सिव्हील कोर्टात दावा करण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ असल्याकारणाने त्याचा तक्रार करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो म्हणून सहकार दरबारच्या माध्यमातून अश्या समस्यांचे निरसन करून मार्गदर्शन केले जाते. या अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे आयोजन हॉटेल शिवार गार्डन, पिंपळे सौदागर येथे करण्यात आलेले होते. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि…
रिद्धी पोतदार, पं. अतुल खांडेकर व ईशान घोष यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाची सुरुवात रिद्धी पोतदार यांचे भरतनाट्यम, पं. अतुल खांडेकर यांचे गायन, ईशान घोष यांच्या तबला वादनाने झाली. पहिल्याच दिवशी रसिकांनी मोठी गर्दी करीत उत्स्फूर्त दाद दिली. दरम्यान, जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांच्या कारकिर्दीला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक विजय जगताप, माजी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंडित सुधाकर चव्हाण, समीर महाजन, नंदकिशोर ढोरे, शशी सुधांशु, जलसंपदा विभागाचे निवृत्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ.संतोषकुमार पांडुरंग मस्तुद,एम.डी.एस, ए सी आय, प्राध्यापक, सेंटर इन्चार्ज, डीपीयु डेंटल इम्प्लांट सेंटर, डॉ.डी वाय पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांना दासना फाउंडेशन ,दासना नॅशनल हेल्थ एक्सलन्सी अवॉर्ड 2024 यांच्यातर्फे ‘एक्सलन्स इन डेंटल इम्प्लांटोलॉजी’अवॉर्ड देण्यात आला. दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन क्लब हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खासदार व सिने अभिनेता माननीय श्री. रवी किशन यांच्या हस्ते मान्यवराच्या उपस्थित देण्यात आला. दंतक्षेत्रातील डेंटल इम्प्लांट सर्जरी या विभागातील केलेल्या उत्कृष्ट कामाचे व सामाजिक कामाचे योगदान म्हणून हा राष्ट्रीय पुरस्कार,दिल्ली येथे देण्यात आला. डॉ.संतोषकुमार यांना विविध राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या…
