- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा ज्युनिअर कॉलेज व प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न झाले. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात जिजाऊ माता जयंती व युवा दिन साजरा करण्यात आला प्रमुख वक्त्या विदुला पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा खजिनदार डॉ. भूपाली शहा उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे डॉ. सुनीता पटनायक प्रा. वैशाली देशपांडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी केले तर आभार प्रा. सुरेखा कुंभार यांनी मानले . प्रतिभा शिक्षण शास्त्र…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून .अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग राेखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. आज लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किर्लीगच्या घटनाबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनांचा आढावा घेण्यात आला. याविषयी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) अंमलबजावणी करावी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बंगलोर आश्रम येथे श्री श्री रविशांकरजी गुरुदेव महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी गुरुदेवांना श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पगडी, उपर्ण भेट देण्यात आले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री श्री रविशंकरजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, चाकण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, लघुउद्योग भारती पिंपरी चिंचवड अध्यक्ष रामामूर्ती थेवर , उद्योजक दत्तात्रय राठोडे, श्रेयांस चौधरी, ओंकार सावंत व अथर्व बेलसरे आदी उपस्थित होते.
पीसीईटी आणि सिंगापूर येथील गोविंद होल्डिंग्स यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतातील स्टार्टअप्स, एमएसएमई उद्योगांना जागतिक पातळीवरती प्रचंड संधी आहेत. याचा फायदा घेण्यासाठी युवकांनी औद्योगिक विकासाची कास धरावी. यामुळे अनेक रोजगार निर्माण होतील. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर होण्यासाठी चाकोरी बाहेरच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देत रोजगार निर्मिती करावी. त्यामुळेच देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन गोविंद होल्डिंग्स सिंगापूरचे संस्थापक संचालक आणि समूह कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद गोविंदालुरी यांनी केले. आधुनिक विज्ञान – तंत्रज्ञानाचा वापर औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात वाढत आहे. महाराष्ट्रातील नव उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स यांना जागतिक पातळीवरील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी, भारतीय विद्यानिकेतन प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मकर संक्रातीचा सण शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील विविध उपक्रमांवर आधारित पतंग, भेटकार्ड बनवणे, सुगडे रंगवणे या स्पर्धानी, तसेच ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’, असा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याबरोबरच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी पूजन व धान्य पूजनाने करण्यात आली. यावेळी लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संसार जत्रेचे आयोजन बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 ते रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 या कालावधीत विश्वेश्वर मंदिर बिजलीनगर चिंचवड पुणे येथे केले होते. या संस्कार जत्रेचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात कुमारी सुप्रिया लोहार हिने गणेश वंदना सादर करून केली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील 35 शाळांनी मिळून 3285 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा सहभाग नोंदवला. या स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार व प्राथमिक शाळा आकुर्डी यांचे 617 विद्यार्थी तर जयवंत भोईर प्राथमिक शाळा भोईर नगर यांचे पाचशे दहा विद्यार्थी सहभाग नोंदवून त्यांनी मानाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जपान हा जगातील प्रगत देशांपैकी एक देश असून या देशाला खुपदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या आपत्तींवर जलद प्रतिसाद देऊन प्रभावीपणे नियंत्रण मिळवले जाते. भारतातील भौगोलिक रचनेचा विचार करून पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार आणि औद्योगिक आस्थापनांची संख्या पाहता जपानमधील आपत्ती व्यवस्थापन पद्धतींमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान केल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षमता अधिक सक्षम होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींवर जलद तसेच प्रभावीपणे नियंत्रण कसे मिळवावे याबाबत…
एमआयटी एडीटीत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ध्येयनिश्चिती करा व ती साध्य होईपर्यंत स्वस्त बसू नका हा, स्वामी विविकानंदांचा विचार आज देशाच्या युवकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. देशाच्या विकासाची मुख्य जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे. ते बुद्धिमान, तंत्रज्ञानाने निपुण आणि सर्जनशील आहेतच. त्यांच्यात नाविण्याचा शोध घेण्याची वृत्ती देखील आहे. परंतु, आपलं आत्मीक सामर्थ्य ओळखण्यात ते कमी पडतात. त्यामुळे, त्यांनी विवेकानंदांचा आदर्श घेवून सामर्थ्य ओळखावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विचार भारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी यांनी केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील कुमार व्यास सभागृहात स्वामी विवेकानंद चेअर तर्फे राष्ट्रीय युवा दिनाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी ९२ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे २६, ७, ७, ७, ४, १४, १५ आणि १२ अशा ९२ सूचना नागरिकांनी मांडल्या. महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिका-यांनी या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. आज झालेल्या जनसंवाद सभेत शहरातील अतिक्रमण हटवावे, ठिकठिकाणी चोकअप झालेली ड्रेनेज लाईन दुरुस्त करावी, पीएमपीएमएल बसस्टॉप वर वाचनालयाची व्यवस्था करावी, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, शहरातील रस्त्यावरील…
– पहिल्या चार दिवसांत 10 हजाराहून अधिक सायकलस्वारांचे ‘रजिस्ट्रेशन’ – अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणेसह विविध संघटनांचा सहभाग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -इंद्रायणी नदी स्वच्छता अन् संवर्धनाच्या जागृती करणे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे आणि युवा पिढीमध्ये सायकलिंग व नियमित व्यायाम याबाबत जनजागृती करणे. या उद्देशाने आयोजित इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या चार दिवसांतच तब्बल १० हजार २८६ हून अधिक पर्यावरण प्रेमींनी सायकल रॅलीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू अशा तीर्थक्षेत्रांना जोडणारी इंद्रायणी नदीबाबत महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदयामध्ये विषेश महत्त्व आहे. इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून वारकरी प्राषण करतात. मात्र, नदी प्रदूषणामुळे इंद्रायणीचे…
