अरविंद एज्युकेशन सोसायटीत ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’चा संदेश देत मकरसंक्रांत उत्साहात साजरी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी, भारतीय विद्यानिकेतन प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मकर संक्रातीचा सण शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील विविध उपक्रमांवर आधारित पतंग, भेटकार्ड बनवणे, सुगडे रंगवणे या स्पर्धानी, तसेच ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’, असा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याबरोबरच राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.



कार्यक्रमाची सुरुवात अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी पूजन व धान्य पूजनाने करण्यात आली. यावेळी लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षा आरती राव यांनी संस्कृती टिकवून ठेवण्यात सणांचे असलेले महत्त्व, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा भौगोलिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना सांगितला.
शिक्षिका निकीता अडसूळे यांनी संक्रांत साजरी करण्यासाठी वापरतात असलेले करा व त्यात धान्य यांची आकर्षक मांडणी करून त्याचे वैशिष्ट्य सांगितले. विद्यार्थीनींनी विविध वेषभूषा करुन वेगवेगळ्या प्रांतातील संक्रातीचे महत्त्व सांगितले. तसेच ‘ढिल दे, ढिल दे दे रे भैय्या’ या गाण्यावर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी नाटिकाही सादर केली. दरम्यान, शिक्षिकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सूत्रसंचालन विद्यार्थीनी तनिषा कुलकर्णी व हर्षदा सत्रे यांनी, कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका बिसमिल्ला मुल्ला, निकीता अडसूळे, स्वाती मोरे यांनी केले.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन
अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत शिकागो येथे केलेले जगप्रसिद्ध भाषण करून विद्यार्थ्यांनी वाहवा मिळवली. तसेच विद्यार्थीनींनी हरे राम, हरे कृष्ण, ही प्रार्थना, ‘आम्ही जिजाऊच्या मुली’ ही ओवी सादर करीत वातावरण भारावून टाकले. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील, तर आपल्या मुलींना जिजाऊप्रमाणे खंबीर व निर्भय बनवा, असे आवाहन केले.








