Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे जैन सोशल ग्रुपचे आंतरराष्ट्रीय संचालक व उद्योजक मनेष शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी संस्थेच्या कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थेचे संस्थापक ,सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीचे प्राचार्य डॉ ए के वाळुंज उपप्राचार्या डॉ क्षितीजा गांधी, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट चे संचालक डॉ सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे, प्रतिभा…

Read More

लोणी-काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग, पुणेतील मॅनेट इमारतीच्या प्रांगणात ७६व्या प्राजसत्ताकदिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विशिष्ट सेवा मेडल प्राप्त(व्हीएसएम) लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी (निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून प्रसंगी उपस्थिती सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल चौधरी म्हणाले, भारत हा खऱ्या अर्थाने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भारतीय संविधान, सामाजिक न्याय व समानतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच वचनबध्द राहिला आहे आणि या पूढेही राहील. मागिल काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भर संसदेत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे काँग्रेस पक्षाने अमित शाह यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘जय बापू’ ‘जय भीम’ ‘जय संविधान’ अभियान देश पातळीवर सुरू करण्यात आलेले आहे. राज्यघटनेत नमूद केलेल्या मुल्यांचा वारसा जतन व संरक्षित करण्यासाठी दि. २७ डिसेंबर, २०२४ रोजी बेळगाव, कर्नाटक येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड , सचिव लहू कांबळे तर अतिथी म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश मधुकर नेवाळे माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे, एपीआय राम गोमारे, हवालदार विनोद होनमाने, अलका सुतार, दामिनी पथकातील सुजाता शिंदे,संस्थेचे सचिव लहू कांबळे,संचालिका नंदा कांबळे, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, सल्लागार सीए प्रा. दत्तात्रय खुणे,सीए पुष्पराज संघवी, विष्णू गायकवाड पोपट आरणे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संचलनाच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.याप्रसंगी मुख्याध्यापक बाबाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सल्लागार सीए प्रा. खुणे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ…

Read More

पिंपरी चिंचवड विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि सुसंस्कृत जबाबदार नागरिक घडवण्याचे काम मागील ३२ वर्षांपासून सुरू आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. साते, वडगाव मावळ येथे पिंपरी चिंचवड विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  शब्दधन काव्यमंच ही साहित्य संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त संस्थेच्या वतीने या वर्षात विविध साहित्यिक उपक्रम होणार आहेत. तसेच “शब्द हे आमुच्या जिवींचे जीवन” हे साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. या नियोजित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर पांडुरंग जगताप यांची संस्थेच्या वतीने एकमुखाने निवड करण्यात आली. याप्रसंगी गुरुवर्य राघवचैतन्य महाराज यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पगडी, शाल, तुकोबाराय यांची अभंगगाथा देऊन शंकर जगताप यांचा सन्मान करून त्यांना स्वागताध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले. शब्दधन काव्यमंचाच्या बोधचिन्हाचे अनावरण शंकर जगताप आणि गुरुवर्य ह. भ. प. राघव चैतन्य महाराज यांच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संत तुकाराम नगर येथे प्रजासत्ताक  दिन साजरा करण्यात आला. संत तुकाराम नगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 76 वा ध्वजारोहण  ह.भ.प शामराव गायकवाड व मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णा जोगदंड होते जोगदंड म्हणाले की ,सर्व भारतीय नागरिकांनी आपण सर्व जण प्रथम भारतीय आहोत. सर्वांनी एकोप्याने गुण्या गोविंदाने राहून जात,धर्म, वंश याचा भेदभाव न करता आपण सर्वजण एकाच भारतमातेचे भुमीपुत्र आहोत याची सर्वांनी जाण ठेवावी. आप आपसातील मनभेद,व मनभेद बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र आले पाहिजे असे मत जोगदंड मांडले.तरुणाई मोबाईलच्या अधिन झाली आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा पार पार पडत आहे. या विवाह सोहळ्यामुळे पुरोगामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाची भर पडत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त म्हणून शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी महत्त्वपूर्ण भर दिला. परंतु त्याही पलीकडे जाऊन हे शहर सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत व्हावे तसेच समाजातील अंतिम घटकाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, सामाजिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केले आहेत. यातूनच दिव्यांगांसाठीचे महत्त्वपूर्ण उपक्रम, बचत गटांसाठी अनेक चांगले उपक्रम, कामगार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो. विधानसभेमध्ये आम्ही हरलो, त्याची कारणे काय आहेत सर्वांना माहीत आहेत. पण, तरीही या पराभवाने खचून न जाता आगामी आणि इतर निवडणुकांना आम्ही सामोरे जात आहोत. या निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो केवळ मुंबई पुरता आहे, अशी भूमिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवडमध्ये शहरात आले असता राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, ”स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे. मुंबई वगळता पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर शहरात एकत्र लढण्याचा सर्वांचाच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या ९३ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर पिंपरीच्या मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंडवरच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नव विवाहित वधू-वरांना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी एकमेकांचा आदर-सत्कार करत प्रेमपूर्वक आणि भक्तीभावनेने कर्तव्यांचे पालन करत जीवन व्यतीत करण्याचा आशीर्वाद प्रदान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. या सामूहिक विवाह सोहळ्या मध्ये पारंपारिक जयमाला तसेच निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह…

Read More