शहर कॉंग्रेसचे ‘जय बापू’ ‘जय भीम’ ‘जय संविधान अभियान’


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधान, सामाजिक न्याय व समानतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच वचनबध्द राहिला आहे आणि या पूढेही राहील. मागिल काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भर संसदेत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे काँग्रेस पक्षाने अमित शाह यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.



कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘जय बापू’ ‘जय भीम’ ‘जय संविधान’ अभियान देश पातळीवर सुरू करण्यात आलेले आहे. राज्यघटनेत नमूद केलेल्या मुल्यांचा वारसा जतन व संरक्षित करण्यासाठी दि. २७ डिसेंबर, २०२४ रोजी बेळगाव, कर्नाटक येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हे अभियान पुढे ढकलण्यात आले होते. नंतर या अभियानाची सुरवात दि. ३ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. अभियानाचा समारोप दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी मध्यप्रदेश येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (महू) येथे करण्यात आला आहे.
त्यानुसार पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी पक्ष कार्यालय, खराळवाडी येथे राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जयहिंद स्कूल मार्गे, साई चौक ते शगुन चौक, पिंपरी कॅम्प यामार्गावर पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा संविधान, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांच्यावतीने संविधानाच्या प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, भाऊसाहेब मुगुटमल, पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमरसिंग नाणेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, सेवादल अध्यक्ष प्रा. ॲड. किरण खाजेकर, ओबीसी सेल अध्यक्ष सोमनाथ शेळके, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष हिरामण खवळे, प्रॉफेशनल कॉंग्रेस विभागाचे अध्यक्ष दाहर मुजावर, व्यापारी सेल अध्यक्ष अमरजितसिंग पाथीवाल, उपाध्यक्ष अबूबकर लांडगे, बाबासाहेब बनसोडे, केनिथ रेमी, सचिन कोंढरे पाटील, भारती घाग, बबित ससाणे, सुवर्णा कदम, सुनीता जाधव, सुनीता मिसाळ, अरुणा वानखेडे, याकुब इनामदार, ॲड. अनिकेत रसाळ, मिलिंद फडतरे, मकरध्वज यादव, सतिश भोसले, आण्णा कसबे, दिपक भंडारी, गौतम ओव्हाळ, सचिन गायकवाड, रवि कांबळे, फिरोज तांबोळी, भिमराव जाधव, भास्कर नारखडे, गुंगा क्षीरसागर, चंद्रकांत हौन्शाळ, बळीराम गायकवाड, रेवजी घाडगे, विशाल शेलार, गणेश शेलार, आदी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








