Author: maharashtrabreakingnews.com

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवांसाठी घेता येणार लाभ पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १० सेवा १ फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आल्या आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागरिकांची शासकीय कामे घरबसल्या ऑनलाईन व्हावी, यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात येत आहे. शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून १० सेवा नागरिकांना दि १ फेब्रुवारी २०२५ पासून ऑनलाइन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आकुर्डी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनजवळ अग्निशमन केंद्र उभारणे तसेच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड (२४ मीटर डी.पी रस्ता) व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड (१८ मीटर डी.पी रस्ता) तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि प्रश्नांचे निराकरण वेगाने करण्यासाठी लोकशाही दिन उपक्रम अत्यंत प्रभावी असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी लोकशाही दिन उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  त्यानुषंगाने आज पार…

Read More

आयुर्वेद व आधुनिक शास्त्राच्या मिलापातून प्रभावी उपचारपद्धती विकसित होईल – डॉ. पी. डी. पाटील यांचे प्रतिपादन; डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठातर्फे डॉ. टोनी नेडर व डॉ. सदानंद सरदेशमुख यांना मानद डॉक्टरेट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “आयुर्वेद हे शाश्वत व प्राचीन शास्त्र आहे. वेदिक संस्कृती, भारतीय परंपरा, आयुर्वेदासारखे प्राचीन शास्त्र आणि त्याला तंत्रज्ञानाची मिळालेली जोड मानवी आरोग्यासाठी प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्यात उपयुक्त ठरेल. आयुर्वेदामध्ये सखोल तंत्रज्ञान व्हावे आणि त्यातून जगाला चांगल्या आरोग्याची संजीवनी द्यावी,” असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठातर्फे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –    पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘स्कूल कनेक्ट’ या उपक्रमाअंतर्गत मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आज भेट दिली. यामध्ये राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर, माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर, माध्यमिक विद्यालय खराळवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. शालेय शिक्षण झाल्यानंतर तांत्रिक शिक्षण या  ज्ञान शाखेचा परिचय महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने स्कूल कनेक्ट या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची भेट आयोजित केली होती. शालेय शिक्षणानंतर करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत, पारंपरिक ज्ञान शाखेसोबतच तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता भविष्यात तांत्रिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदू धर्माचा पाया स्वामी विवेकानंद यांनी घालून दिला. शिक्षणाला वेदांताची जोड दिली. हिंदू धर्माचे वेगळेपण स्वामींनी जगाला दाखवून दिले. स्वामींच्या चरित्रातून धर्म व समाज यांची जडणघडण दिसून येते, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी निगडी प्राधिकरण येथे केले. स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, बाळा शिंदे, सलीम शिकलगार उपस्थित होते. यावेळी बोलताना सोलापूरकर पुढे म्हणाले, हिंदू धर्माची पताका स्वामींनी जगभरामध्ये नेऊन हिंदू धर्माचे वेगळेपण सिद्ध केले. राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेत सण,वार,तिथी, व औद्योगिक वापरत असलेले जी. एस. टी. रिटर्न, टी. डी. एस. पेमेंट , इ.  एस. आय., प्रोफेशनल टॅक्स, प्रॉव्हिडंट फंड भरण्याच्या तारखा इ. ची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाच्यावेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष- संदीप बेलसरे, मा. अध्यक्ष – सुरेशतात्या म्हेत्रे, सचिव- जयंत कड संचालक- संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, भारत नरवडे, स्वीकृत संचालक- माणिक पडवळ, संजय भोसले, दिपक तिवारी व लघुउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने पवारवस्ती चिखली येथील लघुउद्योजक व मेहेर एन्टरप्रायसेसचे संचालक श्री. दिपक तिवारी यांची पवारवस्ती, कुदळवाडी, जाधववाडी चिखली या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकाना शासन दरबारी येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्याकरिता  स्वीकृत संचालक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी पवारवस्ती कुदळवाडी, चिखली या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक मोठयासंख्येने उपस्थित होते. या वेळी दिपक तिवारी यांना स्वीकृत संचालक नेमणुकीचे पत्र देण्यात आले.

Read More

  पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  येथील एमआयटी आर्ट, डिजाईन, टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे आणि आंतरराष्ट्रीय कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन) यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यावसायिक नैतिकता आणि मानवी मूल्ये” या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचा उद्देश कायदा व्यवसायातील नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय व मूल्यांसाठी प्रेरित करणे होता. कार्यक्रमाची सुरुवात एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांच्यासोबत कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी विद्यापीठातील अधिष्ठाता आणि संचालक उपस्थित होते. प्रा. डॉ. कराड यांनी कायदा व्यवसायाचे महत्त्व सांगताना म्हटले की, “कायदा व्यवसाय हा केवळ एक करिअर नसून, तो न्याय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे व्यक्त केले. महात्मा फुले महाविद्यालयाचा इतिहास विभाग, आय क्यू ए सी आणि दर्द से हमदर्द तक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान गौरव विशेष व्याख्यानात ॲड. सतिश गोरडे बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तसेच साहित्यिक प्रदीप गांधलीकर, प्रा. डॉ. संगीता अहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे आणि पदाधिकारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ॲड. सतिश गोरडे पुढे…

Read More