Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन “डी.१” झोन यांनी समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे येथे आयोजित केलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या (पीसीपी) विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले. यामध्ये ८०० मिटर धावणे, लांब उडी, तिहेरी उडी मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.     तसेच १०० मीटर, २०० मीटर आणि  १५०० मीटर धावणे, उंच उडी, मुले व मुली रिले यामधे द्वितीय क्रमांक पटकावून एकूण ९ खेळांमध्ये बक्षीसे मिळवली. यामध्ये दिनेश फड याने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक तसेच उंच उडी आणि तिहेरी उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून वैयक्तिक तीन बक्षिसे पटकावली. दीपक कबाडे याने ८०० मीटर धावण्याच्या…

Read More

पीसीसीओईआर मध्ये ‘रोबोराष्ट्र – २०२५’ या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, देशभरातून १०१ संघाचा सहभाग पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुढच्या काही वर्षात भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स संशोधन, विकास आणि उपयोग यामध्ये अग्रेसर ठरणार आहे. विविध तांत्रिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याकडे भारतीयांचा कल वाढला आहे. भारताच्या विकासासाठी हे उपयुक्त असून जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत अग्रस्थानी असेल, असे मत मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाचे व्यवस्थापक सुनील मेहता यांनी व्यक्त केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘रोबोराष्ट्र – २०२५’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीचे संकलन करणारा सिटी हब उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या होर्डिंग शोध आणि सर्वेक्षण प्रणाली सारखे उपक्रम नागरी हितासाठी उपयुक्त आहेत. पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक शहर बनविण्यासाठी नागरी सुरक्षेच्या दृष्टीने राबविलेले लोककल्याणकारी प्रकल्प महत्वपुर्ण ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांचा भूमीपूजन, लोकार्पण समारंभ तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा जाधववाडी चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिकेच्या सुमारे ४८३.४७ कोटी रुपयांच्या उपक्रमांचे आणि प्रकल्पांचे भूमीपूजन, लोकार्पण मुख्यमंत्री…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. उद्योगाबाबत कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये. अशा सक्त सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचे विस्तारीकरण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाले. औद्योगीकरण वाढले अनेक क्लस्टर तयार झाले. या ठिकाणी गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हे सर्व होत असताना स्वतंत्र आयुक्तालयाची गरज निर्माण…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कुदळवाडी चिखली परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बस स्थानक उभारावे, अशी मागणी युवा नेते दिनेश यादव यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली गावातुन जाणाऱ्या बसेस सर्व मोईफाटा मार्ग पिपंरी चिचंवड या सर्व ठिकाणी जात असताना अनेक प्रवासी हे मोई फाटा येथे बस ची वाट पाहत असतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात यांचा मोठा त्रासविद्यार्थी, नागरिक, जेष्ठ नागरिक, पालक ,महिला यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे सर्व नागरिकांनची मागणी आहे की मोई फाटा येथे बस स्थानक उभारवे , स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.    यामध्ये बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद मिळवून हॅट्रिक केली. कॅरम स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलीटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पीसीपीच्या संघाने या स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद पटकावून हॅट्रिक साध्य केली. मुलींच्या संघाने कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.     सौ. वेणुताई पॉलिटेक्निक, पुणे येथे झालेल्या मुलांच्या कॅरम स्पर्धेत विजेत्या संघांना प्राचार्या डॉ. एम. एस. जाधव…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेटलिफ्टिंग व रेसलिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.     राजगड पॉलिटेक्निक भोर , पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पॉलिटेक्निकच्या विविध तेरा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेते गौरांग राम विंचूरणे याने ७७ किलो वजनी गट, श्रेयश सचिन काकडे याने १०५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, शिवम कैलास बिरादार याने ५६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, अमन विश्वंभर कांबळे याने ९४ किलो…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनमध्ये, १ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    त्यानिमित्त ग्रंथालयात पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह इतर अनेक पालकांनी, वाचकांनी भेट दिली. ग्रंथालयात सामूहिक वाचन सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राबविण्यात आलेल्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उद्घाटन, भूमीपूजन तसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जाधववाडी, चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश सरचिटणीस मनोज  चिंतामण ब्राम्हणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नियुक्तीचे पत्र त्यांना  भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  संजय गजानन गाते यांनी दिले. आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे. ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी भाजपा मध्ये सामील करण्यासाठी आपण अथक परिक्षम कराल असा विश्वास आहे.

Read More