ताज्या घडामोडीपिंपरी

वेटलिफ्टिंग व रेसलिंग स्पर्धेत पीसीपी मुलांचा संघ विजेता

Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेटलिफ्टिंग व रेसलिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
    राजगड पॉलिटेक्निक भोर , पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पॉलिटेक्निकच्या विविध तेरा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेते गौरांग राम विंचूरणे याने ७७ किलो वजनी गट, श्रेयश सचिन काकडे याने १०५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, शिवम कैलास बिरादार याने ५६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, अमन विश्वंभर कांबळे याने ९४ किलो वजनी गटात द्वितीय पटकावला. वेटलिफ्टिंग मध्ये सोहम साळुंखे याने ५७ किलो गटात प्रथम क्रमांक, विकी सांगले ९७ किलो वजनी गटात प्रथम पटकावला.
   कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात विकी सांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर ५७ किलो वजनी गटात सोहम साळुंखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना पंच सुधीर म्हाळसकर, पंच साठे, पंच गणेश, प्राचार्य डी. के. खोपडे, समन्वयक प्रा. एस. के. नाणवरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
     यशस्वी विद्यार्थी व संघ व्यवस्थापक प्रा. गणेश राजे, प्रा. चेतन चिमोटे, अतुल मराठे , डी. बी.सोरटे, राहुल पवार, ठाकरे सर, क्रीडा समन्वयक सुनिल जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी दरकुडे, प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button