ताज्या घडामोडीपिंपरी
ॲथलेटिक्स स्पर्धेत पीसीपीचा दबदबा
प्रथम क्रमांकाच्या तीन पारितोषिकांसह एकूण नऊ पारितोषिके पटकावली


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन “डी.१” झोन यांनी समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे येथे आयोजित केलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या (पीसीपी) विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले. यामध्ये ८०० मिटर धावणे, लांब उडी, तिहेरी उडी मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
तसेच १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटर धावणे, उंच उडी, मुले व मुली रिले यामधे द्वितीय क्रमांक पटकावून एकूण ९ खेळांमध्ये बक्षीसे मिळवली.
यामध्ये दिनेश फड याने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक तसेच उंच उडी आणि तिहेरी उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून वैयक्तिक तीन बक्षिसे पटकावली. दीपक कबाडे याने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून दोन बक्षीस पटकावली. अथर्व रेणुसे याने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. रिले स्पर्धेमध्ये मुलींच्या गटामध्ये राघवी भापकर, प्रतीक्षा तळपे, सुहानी गीते आणि वैष्णवी नागरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच रिले स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामध्ये सौरव शिंदे, हर्षवर्धन पाटील, ज्ञानेश भोर आणि वेदांत कुरकुटे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
संघ व्यवस्थापक राहुल चव्हाण, कुणाल गव्हाणे, ए. व्ही. मुंढेकर, एम. एम. सुरवाडे, ए. एम. सावळे, आर. एच. फुगे, नम्रता सूर्यवंशी, प्रिया उंडे, चैताली तिखे यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकाचे प्राचार्य डॉ. विद्या बॅकोड, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.








