- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाकडून भिमा कोरेगावात अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या पथकामार्फत २९ जानेवारीपासून सातत्याने अनाधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई सुरु आहे. सोमवारी (दि.10) भिमा कोरेगाव (ता. शिरुर) मधील अनाधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील एकूण 55 अतिक्रमित व अनधिकृत बांधकाम असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यात दुकाने, आरसीसी स्ट्रक्चर, सीमा भिंती, तात्पुरते पत्राशेड, होर्डिंग्ज आदी हटविण्यात आले. गेल्या काही दिवसापासून सातत्याने कारवाई सुरू असल्याने सदर ठिकाणच्या जवळपास शंभर अतिक्रमणधारकांनी स्वतः आपली अतिक्रमणे काढून घेत पीएमआरडीएच्या पथकाला सहकार्य केले. यामुळे परिसरातील…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रावेत प्रकल्पातील ९३४ सदनिकांकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने सोडत काढली होती. परंतु महानगरपालिकेकडून रावेत येथील प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मात्र आता रावेत प्रकल्पातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत प्राप्त होणाऱ्या किवळे येथील सदनिका देण्याचे नियोजन आहे. या एका सदनिकेची किंमत १३ लाख ७१८ रुपये असून या दरामध्ये ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यावयचा आहे, त्या लाभार्थ्यांनी संमतीपत्र महानगरपालिकेकडे १५ मार्च २०२५ पर्यंत सादर करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ७५५ सदनिका उभारण्यात येत आहेत. या सदनिका आता प्रधानमंत्री आवास…
महापालिकेच्या वतीने आज घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८२ सूचना प्राप्त नव्याने समन्वय अधिका-यांचीही नियुक्ती पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी एकूण ८२ तक्रार वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरीकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका हद्दीत विविध ठिकाणी जलनिस्सारण नलिका टाकणे, जलनिस्सारण विषयक सुधारणा विषयक कामे करणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, रस्त्याची दुरुस्ती व हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या विषयासह विविध विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समिती सभा आणि महापालिका सभा आज पार पडली. प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेले विविध विषय या बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीत चऱ्होली व कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. २ चिखली, मोशी, प्रभाग क्र. ९ नेहरूनगर, अजमेरा सोसायटी…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांनी शिवसृष्टी थीम पार्कला दिली भेट
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवनेरी, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड ते विशालगड अशा ऐतिहासिक किल्यांची मिळणारी माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र ऐकण्याची संधी, शिवराज्याभिषेकाचे लिखित स्वरूपातील वर्णन मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी व शिक्षकांची ‘शिवसृष्टी’ थीम पार्कला आयोजित केलेल्या भेटीचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सहजरित्या जाणून घेता यावा, यासाठी महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची शिवसृष्टी थीम पार्कला भेट देण्याचा उपक्रम महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हाती घेतला होता. या उपक्रमाचा तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शिवसृष्टी थीम पार्कला भेट देत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोकळ्या जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखा उपाय केला आहे. या कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरातील कावळे वखार मोहननगर येथील सार्वजनिक जागेवर खराब झालेले झाडू, बांबूच्या काठ्या तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करून सुंदर कलाकृती उभारली आहे. ‘आर्ट टू वेस्ट’ ही संकल्पना राबवल्यामुळे हा परिसर कचरामुक्त झाला आहे. शिवाय याठिकाणी आता सेल्फी काढण्याचा आनंदही नागरिक घेऊ लागले आहेत. कल्पकतेला नाविन्यतेची जोड देऊन एखादी सार्वजनिक जागा कचरामुक्त करून अधिक सुंदर बनवण्याची कमाल महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी करून दाखवली आहे. चिंचवड परिसरातील कावळे वखार मोहननगर येथे असणाऱ्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून कचरा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून पिंपरी – चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कराचा भऱणा करण्याचे आवाहन विविध माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे. त्याबरोबरच, शहरातील थकबाकीदारांच्या यादीमध्ये असणाऱ्या शाळा, हॉटेल, ह़ॉस्पिटल, कारखाने, मॉल यासारख्या व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुध्दा करण्यात येत असून आत्तापर्यंत जवळपास ७५७ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून ज्यांनी जप्त मालमत्तेचा थकीत कर आज अखेर महानगरपालिकेकडे जमा केलेला नाही अशा जप्त मालमत्तांवर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याबाबत लवकरच लिलावाची जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. सबब, ज्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे अशा मालमत्ता धारकांनी दि. २५/०२/२०२५…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) “पारतंत्र्यात संघटन कार्य करणे कठीण असतानाही कामगार संघटना चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी अतिशय मोलाचे कार्य केले आहे. कामगारासाठी साप्ताहिक सुट्टी,जेवणासाठी दुपारची सुट्टी,मिलचे काम रात्री बंद ठेवणे,पगार नियोजित तारखेपर्यंत देणे आदी सुविधा मिळवून दिल्या.हे कार्य अतिशय मोलाचे असुन कामगार युग प्रवर्तनाचे आहे.” गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कन्हेरसर, ता.राजगुरुनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन लोखंडे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आल्या.त्यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण बोलत होत्या. कन्हेरसर ग्रामपंचायतच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला कन्हेरसरच्या सरपंच सुनीता…
पीसीयू मध्ये आयईईई ची शाखा स्थापन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तंत्रज्ञान हे मानवतेच्या फायद्यासाठी तसेच प्रगतीसाठी खूप फायदेशीर आहे. पीसीयू मध्ये आयईईईची शाखा स्थापन केल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी आणि त्यांचा गुणवत्ता पूर्वक व्यावसायिक विकास त्यासाठी उपयोग होईल. या नेटवर्किंग मधून अनेक नवनवीन संधी प्राप्त होतील प्राप्त होतील असा विश्वास पिटीसी सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. अजय उल्हे यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनियर्स संस्थेच्या विद्यार्थी शाखेची स्थापना डॉ. अजय उल्हे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पीसीयू कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, आयईईई शाखेचे…
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री विश्वकर्मा जयंती निमित्त चिंबळी (बर्गेवस्ती) येथे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघा तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले असल्याचे कोषाध्यक्ष गुलाब खंडागळे यांनी सांगितले. श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सकाळी अभिषेक व महापुजा करण्यात आली. हभप संतोष महाराज ताजणे यांचे प्रवचनरुपी सेवा रुजू झाली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दुपारी रूपीनगर येथील विठ्ठल रूक्मिणी सांप्रदायिक महिलांचे संगीत भजनांचा कार्यक्रम आयोजित करून महाप्रसाद वाटप झाले यावेळी अध्यक्ष चंद्रकांत कदम, उपाध्यक्ष कालीदास खंडागळे, सरचिटणीस संजय गायकवाड, संघटक शिवाजी भालेकर, अमर गायकवाड, राजेंद्र खंडागळे, उपसरपंच राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संघटक दत्तात्रय…
