- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याक़डून गुरुवारी (ता.१३) घेतला. महापालिका अधिकारी आणि पिंपरी मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी माजी नगरसेवकांनी भोसरी, चिंचवडच्या तुलनेत पिंपरीला महापालिकेच्याा आगामी अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी केली.विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर आ.गोरखे यांनी पिंपरीची अशी ही पहिलीच बैठक घेतली. महापालिका निवडणूक झाली नसल्याने गेले ३५ महिने महापालिकेत प्रशासक राज आहे.त्यामुळे नागरी प्रश्न तातडीने सुटत नसून विकासकामेही प्रलंबित आहे. त्यासाठी आ.गोरखेंनी ही बैठक घेतली.शहरातील दुसऱ्या विधान परिषद सदस्य उमा खापरे या परदेशात असल्याने या बैठकीला…
– इंद्रायणी थडी आणखी काही दिवस लांबणीवर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आणि महाराष्ट्रभरातील महिला भगिनींसाठी आकर्षणाचाच केंद्रबिंदू असणारा इंद्रायणी थडी महोत्सव या वर्षीही २७ फेब्रुवारी ते २ मार्च या चार दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आला होता. पण, काही कारणांमुळे इंद्रायणी थडी महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत आयोजकांकडून अधिकृत पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या उद्योजकता विकासासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या इंद्रायणी थडी महोत्सवाची वर्षभर आपुलकीने प्रतिक्षा असते. यावर्षी विधानसभा निवडणूक आचारसंहिता, निवडणूक निकाल आणि त्यांनरच्या काळातील…
आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने उपक्रमाचे नववे वर्ष मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- मावळ तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि विनासायास पोहोचता यावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम सन २०१६-१७ पासून सुरू असून यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या परीक्षेसाठी २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ या भागातील तळेगाव दाभाडे, लोणावळा, पवनानगर, कामशेत, वडगाव, कान्हे, कार्ला, शिवणे, उर्से, थोरण, डोणे, जांबवली, कांब्रे, चिखलसे, निगडे, आंबळे, खांडी आदी ४६ गावांमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर…
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्जाच्या खतावण्या इंद्रायणीत बुडवल्या, ही जगातली मोठी क्रांती होती : ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्जाच्या सर्व खतावण्या इंद्रायणी नदीत बुडवल्या, ही जगातली सर्वात मोठी क्रांतीकारी घटना होती. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांची विचारसरणी होती. दुष्काळात धान्याची गोदामे लोकांसाठी खुली केली. संकटाच्या वेळी महान तत्ववेत्ता पुढे येतो तेव्हा तो लोकांनाही आपलासा वाटतो, असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे यांनी केले. दरम्यान, भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ‘न सरे ऐसे ज्ञान – संत तुकाराम’ या डॉ. सुहास फडतरे यांच्या व्याख्यानाने हिंदमाता…
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मेदनकरवाडी मध्ये श्रींचे मंदिरात श्री खंडोबा महाराजांचा उत्सव उत्साहात सुरू करण्यात आला. रथ सप्तमी दिनी परंपरेने मानाचे गाडा पूजन झाले. श्री खंडोबा महाराजांचे उत्सवा निमित्त परंपरेने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रींचे पुजारी अरुण तोडकर यांनी सांगितले. उत्सव निमित्त श्रींचे मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई, पुष्प सजावट करण्यात आली आहे. श्री खंडोबा महाराज यांचा पुष्प सजावटीने सजलेला वैभवी मानाचा गाडा पुजन, भंडार वाहत पूजा देखील उत्साहात झाली. यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली. रांगा लावून श्रींचे तसेच मानाचा गाडा दर्शन घेतले. श्री खंडोबा महाराज यांचे सेवेकरी म्हणून चऱ्होली, कुरूळी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील कुदळवाडी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या मोहिमेअंतर्गत आज अखेरपर्यंत २०२ लाख २९ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली २ हजार ८४५ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान ४६५ एकर भूभागावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारी २०२५ पासून कुदळवाडी येथे अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आज मोहिमेच्या पाचव्या दिवशी, सुमारे ९३ एकर भूभागावर पसरलेल्या ४० लाख ५७ हजार…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आज आयोजित बैठकीत दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी बैठकीत २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करीता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानविस्तार कार्यक्रमांतर्गत सायबर सुरक्षा आणि आहार व आरोग्य या विषयावर दोन दिवसीय व्याख्यान कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे सूचनेनुसार व प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. व्याख्यानाच्या प्रथम पुष्पा मध्ये डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी, संगणक व मोबाईल मध्ये कोणत्या प्रकारची माहिती साठविलेली असते. सोशल मीडियाचे धोके काय आहेत, आणि प्रसंगी आपण सुरक्षित व सावध कसे राहायचे या विषयावर सर्विस्तर माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समर्पकपणे निरसन देखील केले, तर टिळक शास्त्र महाविद्यालयाचे डॉ सुरेश इसावे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील कुदळवाडी भागात तब्बल ९६ एकर भूभागावरील सुमारे ४१ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येत आहेत. या कारवाईमध्ये अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे. या कारवाई विरोधात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना आक्रमक झाली आहे. उद्योजकांना गाफील ठेवून महापालिकेने अमानुष व क्रूर पद्धतीने ही कारवाई करीत उद्योगांना देशोधडीला लावले आहे. उर्वरित आठशे उद्योजकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यावर देखील कारवाई झाल्यास नुकसानीचा आकडा अंदाजे पंधरा हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या कारवाईस थेटपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून खतपाणी घातले जात आहे, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘समाजाच्या सात्त्विकतेसाठी शुद्ध आचारविचारांची गरज असते!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रीतम प्रकाश महाविद्यालय, इंद्रायणीनगर, भोसरी येथे व्यक्त केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत जीवनगौरव व अन्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष कृषिभूषण सुदाम भोरे, प्राचार्य सदाशिव कांबळे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ.…
