- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि.२१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच विपणन, विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने पवनाथडी जत्रेचा उपक्रम राबविण्यात येत असतो. यावर्षी देखील असा उपक्रम महापालिकेने आयोजित केला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी आज अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवशंभू शौर्यगाथा’ या भव्य महानाट्यासह ‘शाहिरीतून शिवदर्शन’, ‘सन्मान शिवरायांचा- रंग शाहिरी कलेचा’, ‘काव्यमय समाज प्रबोधन’, विविध विषयांवर व्याख्याने, ‘ढोल पथक वादन’, ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या जीवनावर आधारित शाहिरी’, ‘जागर शिवचरित्राचा’ यांसह शालेय विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारित निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा,रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधनपर्व…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाळा दुर्गम भागात,पट संख्या कमी,सुविधांची कायमच कमी,दळण वळण जिकरीचे, अशा अनेक समस्यांना तोंड देत आदर्श,हुशार विध्यार्थी घडविणे हे शिक्षकांना एक आवाहनच असते. हे आवाहन स्वीकारून शिक्षक संजय होले यांनी हेंद्रुज,बच्चेवाडी शाळेचा पदभार स्वीकारला.या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासात तर तरबेज केलेच पण खेळ,संगीत,क्रीडा,आदी बाबतीत अत्यंत हुशार,बनून एक आदर्श निर्माण केला.त्यांनी स्वतः खर्च करून सुरवात केली व गावातील लोकसहभागातून संगनक,लाऊड स्पीकर,लॅपटेब,स्टेशनरी,लोखंडी कपाट, स्टडी टेबल,वाल कंपाउंड,रंगकाम,ग्राऊंड दुरुस्थी, खेळाचे साहित्य,प्रिंटर ,झेराक्स,आदी साहित्य लोकसभागातून जमा करून एक आदर्श निर्माण केला. या सर्व कार्याची दखल घेऊन व पुढेही त्यांनी असेच कार्य सुरु ठेवावे म्हणून वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधुकर बहिरू…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात चिंचवड मतदारसंघातील विकास कामांचा समावेश करण्यासह भरीव निधीची तरतूद करण्यासंदर्भात आमदार शंकर जगताप आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची आज (गुरुवारी) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर तुषार हिंगे तसेच विशाल मासुळकर, चेतन घुले आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी मागील काही वर्षांत वित्त आयोगाच्या नियमानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात विकास कामांसाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. त्यांनी आगामी अर्थसंकल्पात चिंचवड मतदारसंघातील विकासकामांसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी केली.…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर सलग सहाव्या दिवशीही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५५३ बांधकामांचा समावेश आहे. १३४ एकर क्षेत्रफळामध्ये असलेल्या भूभागावरील सुमारे ५८ लाख चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि पोलीस यांच्च्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, राजेश आगळे, सीताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, शीतल वाकडे, अमित पंडित, सुचिता पानसरे, किशोर ननवरे,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह आणि परवाना विभागाकडून दिला जाणारा होर्डिंग्जचा परवाना, देखरेख आणि नियमन यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एआय-चलित प्रणाली महानगरपालिकेने सुरू केली आहे. या उपक्रमामुळे होर्डिंग्ज परवाना व नियमन काम अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रणालीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. अत्याधुनिक एआय आधारीत प्रणाली म्हणजे सर्वत्र वापरण्यात येत असलेले काल्पनिक बुध्दीमत्ता असणारे प्रगत तंत्रज्ञान आहे. याद्वारे पिंपरी चिंचवड शहरात उभारलेल्या आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकावर देखरेख आणि नियंत्रण सहज शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे यापूर्वी या कामासाठी…
पीसीईटी कडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड प्रदान पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण आणि जिज्ञासा ही सदासर्वकाळ माणसाच्या सोबत असते. आपण जिथे शिक्षण घेतो अथवा काम करतो तिथे आपली जिज्ञासा कायम ठेवली तर , कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जागतिक बाजारपेठेत विकसित आणि विकसनशील देशात अनेक उद्योगात खूप चांगल्या संधी उद्योजकांची वाट पाहत आहेत. भारतीय तरुण उद्योजकांनी व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी जगभरात उपलब्ध असलेल्या या संधीचा फायदा घेऊन आपला उत्कर्ष साधून घ्यावा असे मार्गदर्शन दुबई येथील उद्योजक सावा हेल्थकेअरचे विनोद जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आकुर्डी येथील शैक्षणिक संकुलात विनोद जाधव यांना पीसीईटीचा लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे सन १९८३ व १९८४ मध्ये इयत्ता दहावी बॅच चे विद्यार्थी – विद्यार्थीनी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ४१ वर्षांनी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पुन्हा दहावीचा वर्ग भरविण्यात आला होता. यावेळी ९० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यासाठी मागील आठ महिन्यांपासून हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व वर्ग मित्र व वर्ग मैत्रिणी संपर्क संपर्कात येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव होत्या. तसेच गोकुळ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. माजी शिक्षकांपैकी सुलभा साळवी मॅडम, हरिश्चंद्र मचाले सर, नारायण थिटे सर, गोविंद चितोडकर…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग यांच्या वतीने ०१ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ या दरम्यान भव्य लहुवंदना पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत शालेय व शाळाबाह्य अशा एकूण ६७० स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते तसेच ‘सैराट’फेम सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा, महाराष्ट्र शासन आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अशोक लोखंडे, महाराष्ट्र शाहीर परिषद अध्यक्ष प्रकाश ढवळे, चित्रपटलेखक संजय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रजासत्ताक दिनानिमित जिल्हा परिषदेच्या वरसोली शाळेला ISO को-ऑर्डीनेटर लक्ष्मीकांत सहादू यांच्या हस्ते ISO मानांकन जि. प. शाळा, वरसोली या शाळेला प्रदान करण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांनी ते स्वीकारले. त्याप्रसंगी वेहेरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास विटे, वरसोली गावचे सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच अरविंद बालगुडे, उपसरपंच नलिनी खांडेभरड, सदस्य मंदा पाटेकर, रजनी कुटे, नारायण कुटे, राहुल सुतार, विजय महाडिक, तसेच सरपंच सारिका खांडेभरड, सदस्य शाम येवले, हनुमंत शेलार, भागवत खांडेभरड, नामदेव पाटेकर, राजू खांडेभरड तसेच गावचे पो. पा. हिरा खांडेभरड, ग्रामसेवक दिपक शिरसाट आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.…
