- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी येथील स्वरश्री फाउंडेशनच्या वतीने येत्या 22 व 23 फेब्रुवारी रोजी स्वरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव औंध येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. यंदाचा स्वरश्री पुरस्कार ज्येष्ठ गायक शिवदास देगलूरकर यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक उ. उस्मान खाँ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात 22 फेब्रुवारी रोजी नामदेव शिंदे यांचे शास्त्रीय गायन, अंजली शिंगडे – राव यांचे व्हायोलिन वादन, उस्ताद अर्षद अली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे; तर 23 फेब्रुवारी रोजी आरती ठाकूर यांचे शास्त्रीय गायन, विवेक सोनार यांचे बासरी वादन, तर भीमसेन जोशी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिपच्या अंडर सेवनमध्ये निवड झाल्याबद्दल पर्णिका रोहित इंदापुरे हिचा पिंपळे गुरवमधील विजयराज पतसंस्थेने सत्कार करीत सामाजिक बांधिलकीचा वसा जपला आहे. विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कुरुलकर यांनी सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, मिठाई व मदत म्हणून धनादेश स्वरूपात रक्कम देऊन पर्णिकाचा सत्कार करीत तिला अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण श्रीपती पवार, खजिनदार सखाराम वालकोळी, व्यवस्थापक युवराज नलावडे, सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक, पर्णिकाचे वडील रोहित इंदापुरे, मोठी बहिण समिक्षा इंदापुरे, विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूर्यकांत कुरुलकर म्हणाले, की मोबाईलच्या युगामध्ये खेळाला प्राधान्य देत मेहनत व जिद्दीच्या जोरावर…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तसेच माऊली मंदिरातील श्रींचे मानकरी गणपतराव नारायणराव कुऱ्हाडे पाटील यांचे अल्पशा आजाराने रविवारी ( दि. १६ ) निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे, पुतणे, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष विलासराव कुऱ्हाडे पाटील, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांचे ते चुलते तसेच पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दिनेश कुऱ्हाडे पाटील यांचे ते वडील होत. गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांनी माऊलींचे पालखी सोहळ्यात अनेक वर्ष वारी करीत वारकरी संप्रदायाचा वारसा चालविला. श्रींचे पालखी सोहळ्यात चवरीचे ते मानकरी होते. त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी…
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीच्या लेकींचा मंच या संस्थेच्या वतीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंती निमित्त पिंपळे गुरव येथील शब्दधन काव्यमंच या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या संस्थेचा विशेष सन्मान संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सागर आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. शब्दधनच्या बोधचिन्हाचे शर्ट सदस्यांना देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ‘ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ” या अभंगाने केली.i प्रमुख पाहुणे कवी अनिल दीक्षित होते. सावित्रीच्या लेकींचा मंचाच्या अध्यक्ष रविना आंगोळकर , राधाबाई वाघमारे, आय के शेख,जयश्री गुमास्ते, सूर्यकांत कुरुलकर, मुरलीधर दळवी,प्रकाश घोरपडे, फुलवती जगताप, स्टेला गायकवाड,रुपाली चौधरी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा आणि व्यापक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शाहिरी,व्याख्यान,३०० कलाकारांचे महानाट्य,कवितेतून समाज प्रबोधन अशा विविध कार्यक्रमांना शहरवासियांनी आणि विशेषत: युवा पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा जोपासावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५ चे आयोजन निगडी येथील शक्ती-शक्ती चौक, अ प्रभाग जवळील नियोजित महापौर निवास मैदान, चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर,डांगे चौक,थेरगाव तसेच…
कासारवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील जैन स्थानकामध्ये महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान आणि जैन श्रावक संघ कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ अशोककुमार पगारिया यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस, डॉ अशोककुमार पगारिया, रमणलाल कर्नावट , विलास कुमार पगारिया ,विशाल फुलफगर, संदीप कर्नावट आदीच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर शिबिरामध्ये १०७ जणांची नेत्र तपासणी डॉ. एस. एस. पारख यांनी केली. त्या पैकी ९० जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या ७ वर्षात एकुण ३००० पेक्षा जास्त जणांची मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली आहे आणि २००० पेक्षा जास्त लोकांना मोफत चष्मे वाटप…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताला शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृतीचा मोठा वारसा आहे. या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी विद्यार्थी जोडले जावेत यासाठी अनंतम सारखे सांस्कृतिक सोहळे झाले पाहिजेत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘अनंतम २०२५’ हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा प्रमुख सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या वार्षिक सोहळ्यामध्ये कला, संस्कृती आणि राष्ट्रीय ऐक्याचा भव्य उत्सव अनुभवायला मिळाला. या सोहळ्याच्या आयोजनात ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर ३,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती राहून सहभागी कलाकारांचा उत्साह वाढविला. पहिल्या दिवशी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील शनी मंदिराजवळ मातृ पितृ दिन काल (दिनांक १४ फेब्रुवारी) साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे आई वडीलांच्या प्रती मुलगा असो मुलगी संवेदना प्रगट करण्याची पारंपरिक पद्धत आहे आणि तो दिवस असतो १४ फेब्रुवारी या वर्षी पिंपरी येथील सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. या वेळी मनोहर जेठवानी, तुलसीदास तलरेजा, ज्योती मुलचंदानी, कविता बुलानी,रिता बुलानी,जानकी सावदा,रानी दुसेजा आरती बनमोथा, शैलजा पेंडलवाल,बरखा वनवारी,होरो अटवानी, दिनेश वलेचा सुरिंदर मंघवानी, घनश्याम पोपटानी आदी मान्यवर उपस्थित होते
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक बाजारपेठेत भारताला तिसर्या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने आयोजित केलेल्या सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 15) केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि जस्ट फॉर एन्टरप्रेनर (जे फॉर ई) यांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित सिनर्जी समिटच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळी दिशा दिलेली आहे. त्यांनी चालवलेला विकासाचा ध्यास निरंतर चालू ठेवणार असल्याचा विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. आज शनिवार, दि. 15 रोजी मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी उपमहापौर तुषार हिंगे,…
