स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे विकासाचे कार्य निरंतर चालू ठेवणार – आमदार शंकर जगताप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळी दिशा दिलेली आहे. त्यांनी चालवलेला विकासाचा ध्यास निरंतर चालू ठेवणार असल्याचा विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
आज शनिवार, दि. 15 रोजी मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळवे, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, संदीप नखाते, संदीप कस्पटे, संकेत चौंधे, जयदीप खापरे, कैलास कुटे, नवीन लायगुडे, समीर जवळकर, प्रीती कामतिकर, गोरक्षनाथ झोळ, नंदू कदम, सतीश नागरगोजे, राहुल खाडे, मंगेश धाडगे, निता कुशारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.












