- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील प्रतिष्ठित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने नुकताच आपला 13वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक , सचिव डॉ. दीपक शहा समवेत आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून कॉलेजच्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना कष्ट, सातत्य आणि ध्येयनिष्ठेच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवता येते असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. याप्रसंगी विज्ञान शाखा समन्वयिका डॉ. सुनिता पटनाईक यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले. गेल्या 13 वर्षांत संस्थेने दिलेल्या संधी, विश्वास आणि प्रोत्साहनामुळे आपली शैक्षणिक वाटचाल घडली, असे सांगताना त्या भावुक झाल्या. त्यांच्या शब्दांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या ‘प्रगती पथ यात्रा’ अभियानांतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केशवनगर माध्यमिक शाळेच्या नूतनीकरण कामाची पाहणी केली. या भेटीदरम्यान आमदार शंकर जगताप यांनी शाळेच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, प्रगती आणि वेळेचे नियोजन याबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ‘प्रगती पथ यात्रा’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच स्थानिक पातळीवरील लोकउपयोगी प्रकल्पांचा आढावा घेणे हा उद्देश असल्याचे यावेळी…
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता अभियानासह विविध विकासकामांना मंजुरी पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. या सभेमध्ये शहरातील पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते विकास, आरोग्य सेवा, स्वच्छता, माहिती तंत्रज्ञान तसेच विविध प्रशासकीय विषयांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीस स्थायी समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांची अद्ययावत माहिती असलेली अधिकृत डायरी नगर सदस्य, पत्रकार तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी, सूचना व समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि अधिकाऱ्यांना सातत्याने परस्पर संपर्क साधावा लागतो. मात्र संबंधित विभागांचे कार्यालयीन पत्ते, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ते व आवश्यक माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध नसल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे. यापूर्वी सन २०१७ पर्यंत महापालिकेकडून दरवर्षी अधिकृत डायरी उपलब्ध करून दिली जात होती. मात्र त्यानंतर ही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंजुमन इत्तेहाद तांबोलीयान जमात, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित “Talented Students Encouragement & Felicitation Program 2026” हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गफ्फार सर (प्राचार्य, अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे), प्रा. अनीस कुट्टी सर (शैक्षणिक समुपदेशक) आणि प्रा. मुबीन तांबोळी सर (मोटिव्हेशनल स्पीकर) उपस्थित होते. त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील आचार्य आनंदॠषिजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, विश्वस्त व स्कूल कमिटी सदस्य विलासकुमार पगारिया, संदीप फुलफगर, कल्पेश पगारिया, किरण भंडारी तसेच मुख्याध्यापिका सुलभा मुंगी, पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट आले आहे. त्यामुळे महापालिकेचे जलतरण तलाव बंद करावेत आणि वॉशिंग सेंटरवर कारवाई करा, असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी सोमवारी (दि. 15) महापालिका प्रशासनास दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून सोडलेले पाणी नदीवरील रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलते. दररोज 550 एमएलडी अशुद्ध पाणी उपसा करून ते निगडीतील प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे शुद्धीकरण प्रक्रिया करून संपूर्ण शहराला जलवाहिनीद्वारे पुरविले जाते. पवना धरणातून मावळातील नगरपालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसीलाही पाणी दिले जाते. पवना धरणात 20 टक्केच पाणीसाठा…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे यांच्या संकल्पनेतून आणि उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला NCMC (National Common Mobility Card) वितरण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. नागरिकांना आधुनिक, डिजिटल आणि सुलभ वाहतूक सुविधांशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत सरकारच्या “वन नेशन, वन कार्ड” या महत्त्वाकांक्षी संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले NCMC कार्ड नागरिकांना मेट्रो, बस, सार्वजनिक वाहतूक सेवा, पार्किंग, टोल तसेच विविध डिजिटल व्यवहारांसाठी एकाच कार्डाचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. यामुळे नागरिकांना रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी करून अधिक सुरक्षित, वेगवान आणि डिजिटल पद्धतीने…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील पी. के. चौक सिग्नल परिसरात बीआरटी मार्गातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाने विशेष कारवाई केली आहे. बीआरटी मार्गाचा गैरवापर करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत प्रशासनाने तब्बल २ लाख ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. बीआरटी मार्गावर होणारी अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. काही दिवसांपूर्वी बीआरटी मार्गाचा गैरवापर थांबवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका अनिता संदीप काटे आणि नगरसेविका कुंदा संजय भिसे यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत नियमभंग…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपल्या शहरामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अनेक गुणी कलाकार आहेत. अनेकदा अशा कलाकारांचे योगदान समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही किंवा त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळत नाही. अशा परिस्थितीत कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे कलाकारांना नवसंजीवनी मिळते, तसेच युवा पिढीलाही कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात…
