
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे,नगरसेविका अनिता काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न!
’द आर्ट ऑफ लिविंग’चे सत्यजित भैया यांचे विशेष मार्गदर्शन; शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे रंगले सामूहिक योग शिबिर!
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधून आज रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे सामूहिक योग आणि प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी रहाटणी-पिंपळे सौदागर आणि ‘द आर्ट ऑफ लिविंग’ (The Art of Living) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून स्वतः नागरिकांसोबत योगसाधना केली. याप्रसंगी नगरसेविका कुंदा भिसे, नगरसेविका अनिता काटे,पवना सह.बँकेचे संचालक जयनाथ काटे आणि समाजसेवक संदेश काटे पाटील, संजय भिसे, संदिप काटे, दिनेश काटे पाटील, मनोज ब्राम्हणकर,आर्ट ऑफ लिविंग चे अमित मगर, राजेश पाटील सुप्रिया पाटील, प्रविणशेठ कुंजीर, बाळकृष्ण परघळे, दिपक गांगुर्डे, समीर देवरे, विजय पाटील,श्रीमती शितल पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भजनाच्या ठेक्यावर योगासने आणि सत्यजित भैया यांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘द आर्ट ऑफ लिविंग’चे सत्यजित भैया यांनी व्यासपीठावरून भजनाच्या अत्यंत सुंदर आणि चैतन्यमय ठेक्यावर उपस्थितांकडून योगाचे विविध प्रकार व कठीण आसने अगदी सहजतेने करून घेतली. भजनाच्या तालावर रंगलेल्या या योगसाधनेमुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती झाली होती. यासोबतच सत्यजित भैया यांनी “योग करण्याची अचूक पद्धती आणि दैनंदिन जीवनातील याचे महत्त्व” अतिशय सोप्या शब्दांत उपस्थितांना समजावून सांगितले.
या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सई थेऊरकर या अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीने व्यासपीठावरून अत्यंत कठीण योगासने लिलया सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तिच्या या सादरीकरणाचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. याचसोबत, प्रीती मानकर या महिलाने संगीताच्या तालावर ‘टाळी योगा’ (Clap Yoga) या नवीन आणि अत्यंत नाविन्यपूर्ण योग प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांना ऊर्जावान केले.
”योग हा शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे शास्त्र” – शत्रुघ्न काटे
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, “योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून, ते शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे एक शास्त्र आहे. आजच्या आधुनिक युगात मानसिक शांतता आणि आंतरिक ऊर्जेसाठी योग हाच एकमेव उत्तम मार्ग आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारताचा हा प्राचीन ठेवा आज जगभरात निरोगी आरोग्याचा मूलमंत्र बनला आहे. सत्यजित भैया यांनी भजनाच्या पवित्र ठेक्यावर करून घेतलेली योगसाधना प्रत्येकाच्या मनाला नवी अनुभूती देणारी ठरली. पिंपळे सौदागरमधील प्रत्येक नागरिकाने ‘रोज योग, रोज आरोग्य’ हा संकल्प आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा.”
परिसरातील अबालवृद्ध, महिला व तरुणांनी या सामूहिक योग उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्तम आरोग्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.



