
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील आचार्य आनंदॠषिजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, विश्वस्त व स्कूल कमिटी सदस्य विलासकुमार पगारिया, संदीप फुलफगर, कल्पेश पगारिया, किरण भंडारी तसेच मुख्याध्यापिका सुलभा मुंगी, पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला.



