- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ झालेली असून शहराचे विस्तारीकरण होत आहे परिणामी पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणारे विविध दिवाणी व फौजदारी प्रकरणे यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने पिंपरी न्यायालयात दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांची मोठी गरज असल्याने पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे काल मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते-डेरे यांची मुंबई भेट घेऊन याबाबतचे सविस्तर निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड शहराला नवीन पोलीस आयुक्तालय झाले खरे परंतु, या आयुक्तालयाच्या अख्यारीत येत असणारे वाकड, दिघी, रावेत, देहूरोड, हिंजवडी या पोलीस स्टेशनचे कामकाज आजही पुणे न्यायालयातच होत आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्यावतीने पक्षाची शहर कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष योगेश बहल हे होते. बैठकीस प्रमुख उपस्थिती आमदार आण्णा बनसोडे तसेच शहराचे नवनिर्वाचित निरिक्षक सुरेश पालवे, महिला निरिक्षक शितल हगवणे यांची प्रमुख उपस्थित होती. बैठकीमध्ये पक्षाची नुतन कार्यकारिणी जाहिर करणे, सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ, आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने शहरात पुन्हा एकदा महानगरपालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी योगेश बहल आपल्या भाषणांत म्हणाले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये महिलांना ५०% आरक्षण आरक्षण आहे त्यामुळे अधिकाधिक राष्ट्रवादीतील महिलांनी राजकारणामध्ये अधिक संख्येने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित या शिबिरात पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी हजेरी लावत मोफत आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ४८,७६३ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आणि विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला. त्यात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच पाचशेहून अधिक दिव्यांग बांधव सहभाग झाले होते. लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर २०२५ चे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेतील साहित्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे. आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी मराठी बरोबरच अन्य भाषेतील साहित्यांचे वाचन करत रहा. कथा कादंबरी यांचे वाचन तसेच चांगली नाटकं, चांगले चित्रपट पहा. यातूनच आपल्यातील कलाकार जिवंत राहतो. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. स्वप्न खरी असली की मोठी झेप घेता येते, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने गुरुवारी (दि. २७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनमध्ये गुरूवारी (दि. २७ फेब्रुवारी) काव्यवाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुसुमाग्रज, शांता शेळके, ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे सादरीकरण केले. सिद्धी भगत, कादंबरी कुंभार, सुदर्शन तौर, ऋतुजा वारिंगे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच आर्किटेक्ट स्वप्नील सेठ यांनी मराठी भाषेतील शब्दांची व्याप्ती आणि त्यांचे अनोखेपण याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे मराठी साहित्याचे वाचन करून स्वरचित कविता, लेख, मनातील संकल्पना व्यक्त…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित प्रयोग सादर करीत विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रज्ञ सी. व्ही रमन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मणिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, स्मिता बर्गे, विज्ञान शिक्षिका प्रतिभा ओक, शिल्पा पालकर, तृप्ती जगताप, स्वाती मोरे, उषा साळवे, शिक्षकवृंद,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘हजारो वर्षांची मौखिक परंपरा लाभलेली मराठी ही मुळातच अभिजात भाषा आहे!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डाॅ. केशव सखाराम देशमुख यांनी थेरगाव येथे व्यक्त केले. मराठी भाषा गौरवदिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक रचित ‘काव्य आविष्कार’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डाॅ. देशमुख बोलत होते. यावेळी कवितासंग्रहाच्या ई-आवृत्तीचेही ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच साहित्यिक प्रदीप गांधलीकर, शाळेचा माजी विद्यार्थी व युवा उद्योजक नीलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक नटराज जगताप, मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालविभाग प्रमुख आशा हुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डाॅ. केशव देशमुख पुढे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी पुनावळे-वाकड शाखेतर्फे गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून मराठी भाषेची थोरवी वर्णन करणाऱ्या वैविध्यपूर्ण गेय कवितांचे सुरेल सादरीकरण केले. स्वरोपासनात ऑनलाईन पद्धतीने देखील संगीत शिकवले जाते. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, जर्मनी, यूके, यूएइ, झिम्बाब्वे, प्राग येथील विद्यार्थीसुद्धा मराठी कविता सादरीकरणात सहभागी झाले होते. कुसुमाग्रज, वि. म. कुलकर्णी, सुरेश भट, अभयार्पिता या प्रथितयश ते नवोदित कवींच्या मराठीची महती वर्णन करणाऱ्या कवितांनी विद्यार्थी, पालक आणि संचालक यांना मंत्रमुग्ध करीत श्रवणानंदाची उत्कट अनुभूती दिली. यावेळी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोहम् सार्वजनिक ग्रंथाल्याच्या वतीने पिंपरीत मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या विद्यमान अध्यक्षा वृषाली मरळ यांना मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी, सरचिटणीस अरुण बागडे, संत तुकाराममहाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, सोहम् ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांची सभागृहात उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, ग्रंथ आणि गुलाबपुष्प असे सन्मानाचे स्वरूप होते. याप्रसंगी सोहम् ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती प्राप्त केलेल्या पुरुषोत्तम ढेपे आणि ओंकार जगदाळे या युवा अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ आणि गुलाबपुष्प प्रदान करून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यातील शिव-शंभू प्रेमी युवकांचे प्रेरणास्थान म्हणून नावारुपाला येणाऱ्या या ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ चे पाद्यपूजन आज विधीवत करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा प्रखर हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून बोऱ्हाडेवाडी- मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्याचे झाले आहे. त्यामुळे पुतळा ज्या ठिकाणी उभारला जणार आहे. त्या ठिकाणी पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी मोशी-बोऱ्हाडेवाडीतील ग्रामस्थ यांच्यासह शिव-शंभू विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले की,…
