Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे, आपल्या बहुप्रतिक्षित वार्षिक टेक्नो-कल्चरल फेस्टिव्हल ‘पर्सोना फेस्ट 2025’ साठी सज्ज झाली आहे. हा भव्य उत्सव 11 ते 13 मार्च 2025 दरम्यान आयोजित केला जाणार आहे आणि त्यात संपूर्ण भारतातील 125 हून अधिक महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील 17,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, ज्यामध्ये कांची विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जयशंकरण आणि पद्मश्री डॉ. जब्बार पटेल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सहभागी असतील. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माईर्स शिक्षण समूहाचे संस्थापक प्रो. डॉ. विश्वनाथ कराड भूषवतील. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रो. डॉ.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८० तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १४, १२, ५, ११, ५, ७, १३ आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये “जागतिक महिला दिवस व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन” साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापक रूपाली सोंडे, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेतर्फे गेली दहा ते बारा वर्षांपासून महिलांची जनजागृती, सक्षमीकरण तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार दरवर्षी शाळेत केला जातो. शाळेचे मुख्याध्यापिका रूपाली सोंडे यांनी आपल्या भाषणातून मातृत्व हे परमेश्वराने स्त्रीला दिलेले एक अतुलनीय वरदान आहे. एखादी स्त्री आई झाली तर तिची जबाबदारी निश्चितच वाढते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रगतीशील आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प महायुती सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला. त्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. उद्योग- रोजगार, पायाभूत सुविधा आणि वाहतूक, कृषी आणि जलसंधारण, हरित आणि अनुकूल प्रकल्प, सहकार आणि ग्रामीण विकास यासह महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, प्रकल्प आणि कार्यक्रम असलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने जाहीर केला. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत. नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाखाहून अधिक रोजगारनिर्मितीचा संकल्प आहे. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Read More

कार्यकारी अभियंता यांना निवेदन…अदानी यांच्या कंपनीला दिलेल्या स्मार्ट मीटर व महावितरण खाजगीकरणाला विरोध. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणकडून ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर लादले जात आहे.या निषेधार्थ आज दिनांक १० मार्च २०२५ रोजी कार्यकारी अभियंता यांना पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांची परवानगी न घेता त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असून,अनेक ग्राहक घरी नसतानाही जुन्या मीटरची तोडफोड करून नवीन मीटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत. महावितरणच्या या धोरणाविरोधात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार ग्राहकांना त्यांच्या मीटर निवडण्याचा संपूर्ण हक्क आहे.मात्र महावितरणने हा…

Read More

पिंपळे निलख (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांधकाम व्यवसायिकाने दुसऱ्याचा तीन मीटर रस्ता हा स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवत त्याद्वारे बांधकाम परवानगी मिळवून जागा मालक संदीप काटे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक केली आहे. हा प्रकार नुकताच पिंपळे निलख येथे घडला आहे. दरम्यान यात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकारी आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यात आर्थिक हितसंबंध जोपासले गेल्याचा आरोप जागा मालक काटे यांनी केला आहे. सबंधित फसवणुकीच्या आधी महापालिकेचे उपअभियंता यांना कल्पना दिली होती. वेळेत कारवाई झाली नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचे फावले आणि फसवणुकीच्या माध्यमातून बांधकाम परवानगी मिळवत टीडीआर आणि एफएसआयसाठीची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती काटे यांनी दिली. सविस्तर हकीकत अशी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या पायाभरणीच्या काळात प्रचंड मेहनत घेत सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुले यांच्या कार्यात मोलाची साथ दिली. स्त्री शिक्षणाबरोबर अस्पृश्य सुधारणा, बालहत्या प्रतिबंधक ग्रहातील कार्य तसेच दुष्काळ, प्लेग मधील कार्य या चळवळीत सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला. भारतात स्त्री शिक्षणाच्या पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे कोट्यावधी महिलांचे जीवनात प्रकाश पडला असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी घरेलू कामगार संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांचे तर्फे सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार, निमंत्रक अश्विनी मालुसरे,नीता चव्हाण,अश्विनी काशीद,छाया श्रीमंगले,सुनीता साळुंके,सविता गोपाळे,वर्षा रावळकर, मयुरी कोरे,पूनम पाटील, मीरा बागल,राजश्री…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. पण हा अर्थसंकल्प कष्टकरी, शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी निराशाजनक ठरला आहे. महाराष्ट्र राज्यातील असंघटित कामगारांचे जीवन खडतर आणि धोक्याचे आहे,यांच्यासाठी वेगवेगळे महामंडळ व्हावे म्हणून अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्न करीत आहोत जून २०२३ मध्ये या सरकारने ३९ आभाशी महामंडळाची घोषणा केली मात्र ते हवेतच विरली. आजच्या अर्थसंकल्पामध्ये १ कोटी ७५ लाख असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विचाराधीन असल्याचे फक्त म्हटले आहे मात्र अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही यामुळे निराशा झाली आहे. राज्यात दररोज कामगारांचे अपघाती मृत्यू होत आहेत त्यांना विमा आहे संरक्षण नाही, कष्टकऱ्यांना किमान – समान वेतनाची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाहतूकदार कष्टकरी सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा अर्थसंकल्प अजित दादा पवार यांनी मांडला. सर्वांसाठी घरे हे उद्दीष्ट येत्या ५ वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महत्वाकांक्षी योजनांना निधीचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता केंद्रीय सहाय्य, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून सहाय्य , सार्वजनिक मालमत्तेचे मुद्रीकरण, योजनांचे सुसूत्रीकरण तसेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास सारखे नाविण्यपूर्ण उपक्रम चांगला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत स्मार्ट पीडीएस आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे. अजित दादांनी ११ वेळ अर्थसंकल्प मांडला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. – बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत., महाराष्ट्र रिक्षा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘रानजाई महोत्सव’ चे उत्कृष्ट आयोजन केले आहे. शहरातील नागरिकांनी या महोत्सवात फळे, फुले, भाजीपाला स्पर्धेमध्ये भाग घेऊन पर्यावरणाप्रती आपले योगदान दिले आहे ही कौतुकास्पद बाब आहे, असे सांगून त्यांनी दुर्गादेवी टेकडीवर पूर्वी एकही झाड नव्हते, तेव्हा महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण दुर्गादेवी टेकडीवर विविध प्रजातींच्या झाडांच्या बिया पेरण्यात आल्या, त्यामुळे आज दुर्गा टेकडी हिरवेगार वनराईचे क्षेत्र बनले असून ही टेकडी पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरली आहे. तसेच सध्या महापालिकेला कोणत्याही उपक्रमांचे चांगले नियोजन आणि आयोजन करणारा अधिकारी वर्ग लाभला आहे. शासनाच्या १०० दिवसाच्या उपक्रमामध्ये नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राज्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More