ताज्या घडामोडीपिंपरी

महापालिकेच्या वतीने आयोजित रानजाई महोत्सवाचा समारोप, विविध स्पर्धा प्रकारातील पारितोषिकांचे वितरण

महानगरपालिकेकडून रानजाई महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन - आमदार उमा खापरे

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘रानजाई महोत्सव’ चे उत्कृष्ट आयोजन केले आहे. शहरातील नागरिकांनी या महोत्सवात फळे, फुले, भाजीपाला स्पर्धेमध्ये भाग घेऊन पर्यावरणाप्रती आपले योगदान दिले आहे ही कौतुकास्पद बाब आहे, असे सांगून त्यांनी दुर्गादेवी टेकडीवर पूर्वी एकही झाड नव्हते, तेव्हा महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण दुर्गादेवी टेकडीवर विविध प्रजातींच्या झाडांच्या बिया पेरण्यात आल्या, त्यामुळे आज दुर्गा टेकडी हिरवेगार वनराईचे क्षेत्र बनले असून ही टेकडी पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरली आहे. तसेच सध्या महापालिकेला कोणत्याही उपक्रमांचे चांगले नियोजन आणि आयोजन करणारा अधिकारी वर्ग लाभला आहे. शासनाच्या १०० दिवसाच्या उपक्रमामध्ये नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राज्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे प्रतिपादन आमदार उमा खापरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ या २८ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला प्रदर्शनाचे व स्पर्धेचे आयोजन नियोजित महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. या तीन दिवसीय महोत्सवाची सांगता काल विधान परिषद आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाली, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार उमा खापरे या बोलत होत्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उद्यान अधिक्षक योगेश वाळुंज, राजेश वसावे तसेच वृक्षप्राधिकरण समितीचे माजी सदस्य हिरामण भुजबळ, सुरेश वाडकर, संभाजी बारणे आणि महापालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘शहराच्या हरीत संवर्धनासाठी तसेच शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राजमाता जिजाऊ उद्यान सारख्या उद्यानांसोबतच थीम पार्क उद्यान बनविण्यावर भर देणार आहोत. दुर्गा देवी टेकडी वरील झाडांची संख्या वाढवण्याचा मानस आहे. त्यासाठी लवकरच नागरिकांकडून संकल्पना मागवल्या जाणार आहेत. शहरातील रस्ते दुभाजाकमध्ये देखील चांगली झाडे लावली जात आहेत. शहरात सार्वजनिक ठिकाणी शक्य तेथे स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. उद्यान विभागाने नव्याने समाविष्ट भागामध्ये उद्यानाची निर्मिती करावी, यासाठी देखील नियोजन सुरू आहे. पुढील वर्षी या महोत्सवाचे स्वरूप आणखी बदलणार असून शक्यतो हिवाळ्यात हा महोत्सव भरविण्याचे नियोजन करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘उद्याने प्रत्येक शहराचे हृदय असते. लहान मुलांना निसर्गाची गोडी लागावी, यासाठी महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, व एक झाड लावण्यास द्यावे. हा प्रयोग नक्की यशस्वी होईल, असे वाटते. शक्य त्यांनी आपल्या घराच्या छतावर छोटेसे फुलबाग फुलवावी व शहराच्या हरित उप्रकमास साथ द्यावी. महापालिकेच्या उद्याना विभागाच्या वतीने सुयोग्य नियोजन करून या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यावेळी महोत्सवाच्या माध्यमातून टेरेस गार्डन, घरगुती रोपसंवर्धन आणि लँडस्केप डिझाइन या स्पर्धांमधील विजेत्यांना फिरती पारितोषिके व रोख रकमेची बक्षिसे देखील देण्यात आली. या बक्षीस विजेत्यांमध्ये १५१ प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची १४३ तर तृतीय क्रमांकाची १२१ अशा एकूण ४१५ बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाची जाणीव निर्माण व्हावी, शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या हेतूने महापालिकेच्या वतीने २८ वर्षांपासून रानजाई महोत्सवाचे आयोजन केले जाते. निसर्गसौंदर्याने नटलेली फुलांची आकर्षक सजावट, कलात्मक आकृती मांडणी आणि हरित वातावरणाचा समृद्ध अनुभव रानजाई महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना मिळत असतो.

रानजाई महोत्सवात विविध फळे, फुले, रोपे आणि वृक्षांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. त्यामध्ये विविध विभाग बनविण्यात आले होते. त्यामध्ये शोभिवंत कुंड्या, कलात्मक मांडणी, गुलाबपुष्प, हंगामी फुले, फळे, उत्तम भाज्यांचा संग्रह, फुलांची रांगोळी, निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू, बाग स्पर्धा, वृक्षसंवर्धन स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील विजेत्यांना महोत्सवाच्या समारोप प्रसंगी विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

कारखानदार बाग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे –
कारखानदार बाग स्पर्धेत ब उपविभागात सिंटेल इंटरनॅशनल प्रा. लि. तळवडे यांनी प्रथम क्रमांक, इन्फोसिस लिमिटेड हिंजवडी यांनी द्वितीय, के.एस.बी. लिमिटेड पिंपरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर अ उपविभागात सँडविक कोरोमंट इंडिया प्रा. लि. दापोडी यांनी प्रथम क्रमांक, ऑर्लीकॉन ब्लाझर्स कोटिंग इ. प्रा. लि. भोसरी यांनी द्वितीय क्रमांक तर टाटा मोटर्स सी. यु. बी. यु. भोसरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. क उपविभागात सिंटेल इंटरनॅशनल प्रा. लि. तळवडे यांनी प्रथम क्रमांक, इन्फोसिस लिमिटेड हिंजवडी यांनी द्वितीय तर एलांटास बेक (इ ) लिमिटेड, पिंपरी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

शासकीय व इतर संस्थांच्या बाग स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे –
शासकीय व इतर संस्थांच्या बाग स्पर्धा मध्ये क उप विभागात एफ. इ अँड एम, सी एम ई दापोडी यांनी प्रथम क्रमांक, हिंदुस्थान पेट्रोलियम मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट निगडी यांनी द्वितीय तर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग फॅक्टरी कॉम्बट इंजिनिअरिंग इ. एम. इ. पी.ओ पुणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच ब उप विभागात बिर्ला सॉफ्ट लि. हिंजवडी यांनी प्रथम, हिंदुस्थान पेट्रोलियम मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट निगडी यांनी द्वितीय, लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया झोनल ट्रेनिंग सेंटर निगडी प्राधिकरण, आकुर्डी, यांनी तृतीय क्रमांक तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गहुंजे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला आहे.

रोपवाटिका स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे –
१) सुफलम नर्सरी, वाकड
२) साईराज नर्सरी, शेडगे वस्ती, वाकड

खाजगी बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे –
१) जितेंद्र कौशिक (मॅप क्वाटर्स, सी.एम.ई, दापोडी)
२) स्मिता रांका (सेक्टर नं. २४, चिंतामणी मंदिरासमोर, सरस सोसायटी, निगडी)
३) सृष्टी शेटे, निगडी प्राधिकरण
४) प्रियांका रिंगे, सेक्टर नं. २७, पोस्ट ऑफिस समोर, निगडी प्राधिकरण)

१५१ चौ. मी ते २५० चौ. मी पर्यंत खाजगी बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची नावे –
१) नितीन खन्ना (रक्षक सोसायटी, औंध कॅम्प, पिंपळे निलख)
२) युवा सोडानी (सेंच्युरी इन्का कॉलनी नं. १, टेल्को रोड, भोसरी)
३) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एच. पी, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, मुंबई महामार्ग, निगडी जकात नाक्यासमोर)
४) प्रविण धोका (हिंदुस्थान बेकरीसमोर, चिंचवड)

२५१ चौ. मी पेक्षा जास्त बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्वर्धकांची नावे –
१) कविता बहल (वृंदावन गंगा स्काईजच्या समोर, संत तुकाराम नगर)
२) निखील वर्मा (हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, एच. पी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट, मुंबई महामार्ग, निगडी जकात नाक्यासमोर)
३) सुरेश तापकीर (आझादनगर, चोविसवाडी, चऱ्होली)

स्वच्छ व सुंदर घर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे –
१) राजू तापकीर (तापकीर प्लाझा, मारूती मंदीरामागे, निगडी)
२) बंडोपंत भोसले (अभिनय कॉलनी, रावेत)
३) डॉ. शिवाजीराव पाटील (विशालनगर, पिंपळेनिलख)

घरातील अंतर्गत क्षेत्र १०१ ते १५० चौ. मी. स्वच्छ व सुंदर विजेत्या स्पर्धकांची नावे –
१) निशा शिंगवी (निगडी प्राधिकरण)
२) चंद्रशेखर इवले (शिवतेजनगर, पुणे)
३) अतुल कांकरिया (एसकेएफ कंपनीजवळ, चाफेकर चौक)

१५० चौ. मी पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या स्वच्छ व सुंदर स्पर्धेतील स्पर्धकांची नावे –
१) जास्मिन पोखरणा (चिंचवडगाव)
२) कविता बहल (संत तुकाराम नगर, पिंपरी)
३) शितल घनोकार (शिवतेजनगर, तिरंगा चौक)

खाजगी बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धा (१५० चौ. मी व तत्सम घरगुती बंगले, गृहरचना संस्था, कंपनी) –
१) एलांटास बेक (नेहरूनगर, पिंपरी)
२) ऑर्लीकॉन बाल्झर्स कोटिंग इंडिया प्रायव्हेट लिमीटेड, आकुर्डी
३) असीम विश्व सहकारी गृहरचना संस्था (एसकेएफ कंपनीसमोर, चिंचवडगाव)

खासगी बंगल्या भोवतालच्या बाग स्पर्धा (१५० चौ. मी व तत्सम घरगुती बंगले) –
१) जयश्री कुलकर्णी (शिव कुसूम बंगला प्लॉट, गंगानगर, निगडी)
२) गौरी कोकिळ (करिश्मा ग्लोरी, मोरवाडी, पिंपरी)
३) श्रीकांत पाखले (से. नं. २७ प्राधिकरण)

वृक्षसंवर्धन स्पर्धा (खाजगी शाळा व महाविद्यालये – कमीत कमी २५ वृक्ष) –
१) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, निगडी प्राधिकरण
२) डॉ. डी. वाय पाटील, निगडी प्राधिकरण
३) पु. जि. शि. म. संचलित आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, निगडी प्राधिकरण

वृक्षसंवर्धन स्पर्धा (सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे – कमीत कमी २५ वृक्ष) –
१) हिंदुस्थान पेट्रोलियम, भक्ती शक्ती, निगडी
२) लाईफ इंशुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निगडी प्राधिकरण, आकुर्डी
३) अविरत श्रमदान, दत्तनगर, दिघी डोंगर

वृक्षसंवर्धन स्पर्धा (गृहरचना संस्था – कमीत कमी २५ वृक्ष) –
१) लाईफ रिपब्लिक कोलते पाटील टाऊनशिप, पुनावळे
२) एम एम आर क्वीन्स टाऊन हौसिंग सोसायटी, चिंचवडगाव
३) फेडरेशन ऑफ घरकुल, स्पाईन रोड, घरकुल, चिखली

उदयान विभागाचा सर्वात मोठा पुरस्कार महापौर चषक व आयुक्त चषक याचेही वितरण करण्यात आले. त्यामध्ये लक्ष्मी फ्लावर ऍन्ड डेकोरेशन, भोसरी यांना महापौर चषक देण्यात आला तर हिंदुस्थान पेट्रोलियम, भक्ती शक्ती, निगडी यांना आयुक्त चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच इतर स्पर्धेत लक्ष्मी फ्लॉवर एन्ड डेकोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम, निगडी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , निगडी प्राधिकरण, जयवंतराव टिळक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, सीआयई इंडिया, महिंद्र स्टील, विशाल इंटरप्राईजेस, प्रिया भोसले, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, एफसीबीआरएनपी, सीएमई, सुखद गारवा, सुषमा रासने, डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी , डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ एमबीए, कांचन क्षीरसागर, वाय बी पाटील पॉलिटेक्निक कॉलेज रावेत, शिव कानडे, एफ अंड एम सी एम ई, डॉ. डी वाय पाटीलजुनिअर कॉलेज ऑफ ए सी एस , डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एम सी ए , डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ अग्रीकल्चर, प्रशांत उगले, डॉ. डी वाय पाटील अप्लाइड आर्ट्स अंड कॉमर्स, मीनाक्षी कांबळे, प्रसेनजीत वजनारे, यज्ञेश टिळेकर, ज्ञानशांती इंग्लिश मिडीयम स्कूल, आयुर्वेदिक कॉलेज निगडी, अखिलेश ठाकरे, गणेश बोराडे, प्रियांका भागवत, भानुदास तापकीर, लक्ष्मन बाळकू कुंदे, शीतल महाजन, अथर्व बागडे, अराईज स्कूल , उत्कर्ष भोसले, डॉ. डी वाय पाटील युनिवर्सिटी, योगिता भंगाळे, लता रखमाजी गायकवाड, लिंबराज कांबळे या स्पर्धकांनाही मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर उपस्थितांचे आभार उद्यान अधिक्षक योगेश वाळुंज यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button