Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रावेत येथे आयोजित केलेल्या ‘रंगात रंगुनी सार्‍या…’ या विनोदी, विडंबन कविसंमेलनात श्रोते हास्यरंगात चिंब झाले. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ एकपात्री कलाकार आनंद मुळूक, श्री संत तुकाराममहाराज सहकारी साखर कारखाना संचालक चेतन भुजबळ, कामगार नेते हेमंत कोयते, ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, नवयुगचे कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, संचालक प्रा. पी. बी. शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मोरेश्वर भोंडवे यांनी, ‘कवितांनी आज आनंद दिला. आईवडील हयात नसल्याने कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींमध्ये मी त्यांचे रूप पाहतो!’ अशी हृद्य भावना व्यक्त…

Read More

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे आहे, असे सांगत ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांचे बीजेनिमित्त कीर्तन झाले. संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आयोजित गाथा पारायण आणि कीर्तन सप्ताहात बीजेच्या दिवशी त्यांचे कीर्तन झाले. कीर्तनासाठी घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं । मुक्तं आत्मिस्थती सांडवीन ॥१॥ हा अभंग घेतला. कदम महाराज म्हणाले की, शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर बाबांच्या आशीर्वादाने हा सोहळा सुरू झाला म्हणूनच हा सोहळा यशस्वी झाला. भंडारा डोंगरावर सुरू असलेल्या तुकाराम महाराज मंदिराच्या कामाला गती मिळावी म्हणून…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ”वारसा प्रमाणपत्र’ हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे!’ असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती अभय ओक यांनी आय एल एस लॉ विधी महाविद्यालय, पुणे येथे व्यक्त केले. पिंपरी – चिंचवडमधील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अर्जुन दलाल, प्रा. डाॅ. नीलिमा भडभडे आणि ॲड. हिमांशू सारस्वत लिखित Heirship Certificates (हेअरशिप सर्टिफिकेट्स) सन १८२७ चा मुंबई विनियम ८ अंतर्गत दिले जाणारे वारसा हक्क प्रमाणपत्र अर्थात ‘वारसा प्रमाणपत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना अभय ओक बोलत होते. याप्रसंगी इंडियन लॉ सोसायटीच्या डॉ. वैजयंती जोशी, ॲड. श्रीकांत कानिटकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश डॉ. शालिनी जोशी – फणसळकर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था संचलित केली जाते. मोरवाडी येथे संस्थेची इमारत आहे. मात्र, सदर इमारत जुनी झाली असून, ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आणि राज्य सरकारच्या मदतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरीत कायमस्वरुपी नवीन अध्ययावत सोयी-सुविधायुक्त इमारत उभारावी, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्यस्थितीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व कासारवाडी येथे 20 ट्रेडसचे प्रशिक्षण देण्यात येते. या ठिकाणी एकूण 42 तुकड्या आहेत. काही दिवसांपूर्वी, महानगरपालिका प्रशासन आणि…

Read More

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकरी संप्रदायाबद्दल माझे मनात आदर आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहू देवस्थानने मला त्यासाठी संस्थान ने योग्य समजले. हे माझ्या साठी फार भाग्याचे आहे. पुरस्कार दिल्या बद्दल मी संस्थानचा मनापासून आभारी आहे. वारकऱ्यांची देखील सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारातून मिळाली आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली आहे. अशा पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय याच्या पेक्षा दुसरं भाग्य नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे,…

Read More

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्या निमित्त देहूत श्रींच्या दर्शनास हरिनाम गजरात भाविकांनी गर्दी केली आहे. देहूत रविवारी ( दि. १६ ) लाखो भाविकांचे उपस्थित संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा साजरा झाला. देहूत इंद्रायणी नदी घाट परिसरासह श्रीक्षेत्र देहूत विविध ठिकाणी बीज सोहळया निमित्त हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. कीर्तन, प्रवचन, गाथा भजन, गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा – माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला. इंद्रायणी नदी घाटावर, संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि श्री…

Read More

देहू,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम ॥१॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला हा पुरुषार्थ ॥२॥ जळी दगडासहित वह्या । तारीयेल्या जैशा लाह्या ॥३॥ म्हणे रामेश्वरभट द्विजा । तुका विष्णू नाही दुजा ॥४॥ श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ व्या बीज सोहळा राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविक वारकरी यांच्या उपस्थितीत हरिनाम जयघोषात श्रींचे सदेह वैकुंठ गमन प्रसंगावर आधारित हभप बापूसाहेब मोरे, महाराज देहूकर यांचे सुश्राव्य हृदयस्पर्शी कीर्तन सेवेने बीज सोहळा नामजयघोषात साजरा झाला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजकाल न्याय वेळेत मिळणं फार मुश्कील झालंय. न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायची, ‘तारीख ते तारीख’ चक्रात अडकायचे. यात मरून जाते न्याय मिळण्याची अपेक्षा. न्यायाचा लढा सोप्पा नाही हे कटू सत्य आहे. न्यायव्यवस्थेत हे निराशाजनक चित्र आहे. मात्र, याच व्यवस्थेत आशेचा किरण डोकावलाय, ‘दर्द से हम दर्द तक ट्रस्ट, महाराष्ट्र च्या रूपात. कोर्टाच्या पायरीवर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी शेकडो जण पुढे आलेत. एका सेवाभावी संस्थेने जन्म घेतलाय, अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर यांच्या संवेदनशील मनातून. सामान्यांना वर्षानुवर्षे न्याय का मिळत नाही? दोषी सिद्ध झालेले नसतानाही लोक आयुष्यभर तुरुंगात का सडतात? कायदे आहेत; पण त्या कायद्यांच्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधील माजी विद्यार्थ्यांचे यश हे सर्व प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे आहे. या माजी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून प्राध्यापकांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते असे एसबीपीआयएम च्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये बारावा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्यास डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. रूपाली कुदरे, हेमंत राजेशथ, आकाश राऊत, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ.स्वप्नील सोनकांबळे, डॉ. भूषण परदेशी, एमबीए प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी “एसबीपीआयएम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविक, रोज हजारोंच्या संख्येत गाथा पाराण, हजारोंचा तुकाराम जप, हजारो भाविकांना प्रसाद, हा प्रसाद करणारे हजारो हात.. अशा भव्य वातावरणात पार पडणारा जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्याची इतिहासात निश्चितच नोंद राहील. या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सांप्रदायात लोकांमध्ये भक्तिची भावना वाढीस लागली पाहिजे. असे सोहळे दरवर्षी झाले पाहिजेत. त्यानिमित्ताने लोकांच्या हातून दान केले जात आहे. कुठेतरी आपण समाजाचे, संतांचे देणे लागतो, याचे उतराई होण्याचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे. संप्रदायाविषयीची लोकांची भावना दृढ होत असते. हा सोहळा आयोजित करण्यात आला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर नामजप करण्यात आला आणि तो यशस्वी झाला.…

Read More