- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
वसुंधरापूरक उपक्रमांतून शहर हरित व शाश्वत करण्याकडे महत्त्वाचे पाऊल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभावीपणे काम करत असून, आरोग्य विभागाच्या माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रीन सोसायटी’ हा उपक्रम शहरात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. या उपक्रमामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वसुंधरापूरक उपक्रमांची चळवळ निर्माण झाली असून, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २४ येथील रॉयल कॅसल सोसायटीने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श निर्माण केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल…
महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम, जनजागृती आणि पाणी बचतीची सामूहिक प्रतिज्ञा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक जल दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट, पिंपरी यांच्या सहकार्याने रावेत बंधारा येथील पवना नदी काठावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जागतिक जल दिनाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, जलस्रोतांचे वाढते प्रदूषण तसेच नदी, नाले आणि पाणवठ्यांच्या स्वच्छतेची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून करण्यात आली. त्यानंतर नदीकाठ व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रत्यक्ष कृतीद्वारे जनजागृती करण्यात आली. या उपक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी पाण्याची बचत व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी चौक ते आकुर्डी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेलच्या बांधकामामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मेट्रो कामादरम्यान रस्त्यावर माती व मुरुम मोठ्या प्रमाणात साचत असून, त्यावर पाणी पडल्याने चिखल तयार होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित मेट्रो प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी दुचाकीस्वारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाशीही…
पीसीयूमध्ये “इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र” चे उद्घाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोणतेही संशोधन हे कार्यशाळा व शैक्षणिक संकुला पुरते मर्यादित न राहता त्याचा समाजासाठी, उद्योगासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग झाला पाहिजे. सरकारने देखील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान सहा ते सात टक्के निधी हा संशोधनासाठी उपलब्ध करून दिला, तर त्यातील वाढता सहभाग, गुणवत्ता आणि परिणामकारकता ही विकसनशील भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत करण्यासाठी उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे “इनोव्हेशन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीत फुलोरा निर्मित ‘चैत्रपाडवा’ गीताचे लोकार्पण कस्पटेवस्ती सकल हिंदू संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. गुढीपाडव्या निमित्त सकल हिंदू संमेलनाचे कस्पटेवस्ती वाकड, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतुल अग्निहोत्री, ह.भ.प. महादेवमहाराज भुजबळ, सुधीर आयाचित, संतोष कस्पटे, संदीप चिलेकर यांच्या शुभहस्ते विराट हिंदू संमेलनामध्ये सादरीकरणासह या गीताचे लोकार्पण करण्यात आले. “शुभारंभ करी शक गणनेचा करुनी पराभव दुष्ट जणांचा शालिवाहन नृपती आठवा चैत्र मासीचा गुढीपाडवा…” कवयित्री मंगला गोखले यांच्या ह्या गीतास अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केले असून अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी, अथर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र. २० मधील संत तुकारामनगर परिसरात वाढलेल्या टपरीमाफिया व अतिक्रमणाच्या समस्येविरोधात नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. परिस्थिती सुधारली नाही तर संत तुकारामनगरचे नाव ‘टपरीनगर’ करण्याची उपरोधिक मागणी त्यांनी केली आहे. नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी सांगितले की, महानगरपालिकेवर प्रशासक असताना या भागात टपरीधारकांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. संत तुकारामनगर, मेट्रो स्टेशन परिसर, वल्लभनगर एसटी स्थानक, वाय.सी.एम. रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय तसेच मंडई परिसरात टपरीमाफियांनी पदपथांवर अतिक्रमण करून फेरीवाल्यांना जागा भाड्याने देत बेकायदेशीर वसुली सुरू केली आहे. या टपरीधारकांकडून ग्राहकांची वाहने रस्त्यावर अनियंत्रितपणे पार्क…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या ‘सखी आंगण’ या महिला सक्षमीकरणाच्या अनोख्या उपक्रमाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासन आणि सहभागी महिला बचत गटांचे विशेष कौतुक करत आमदार अमित गोरखे यांना शुभेच्छा पत्र पाठवले आहे. हे सन्माननीय पत्र आमदार गोरखे यांनी आज नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. या भेटीदरम्यान शहरातील नवीन विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक शिस्त आणि…
पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचा उत्साहात समारोप पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचा सुरेल समारोप (शुक्रवार, दिनांक २० मार्च) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या ‘घन अमृताचा…’ या सांगीतिक मैफलीच्या माध्यमातून करण्यात आला. श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे संपन्न झालेल्या उत्सवाच्या अंतिम दिवशी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, भाजप पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, माजी नगरसेवक मधू जोशी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर (प्रभाग २८) येथील कुणाल आयकॉन रोडच्या सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आज माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या कामाचा दर्जा, गती आणि नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी कुणाल आयकॉन, शुभश्री आणि साई अवेन्यू या सोसायट्यांच्या गेटसमोर पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी चेंबर उभारून ते स्टॉर्म वॉटर लाईनला जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यास मदत होणार आहे. पाहणीवेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे डेप्युटी इंजिनिअर चंद्रकांत मोरे, विद्युत विभागाच्या डेप्युटी इंजिनिअर दिपाली रेडे, स्थापत्य विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर विवेक गजपुरे, पाणीपुरवठा…
महोत्सवाच्या तिसऱ्या सत्राचा पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या व्हायोलिन वादनाने समारोप पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादनाच्या सुरांनी नटलेल्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणामुळे पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस अक्षरशः रंगून गेला. देश-विदेशात हिंदुस्तानी संगीताचा ठसा उमटवणारे पंडित राम शंकर, ज्येष्ठ गायक डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना संगीताची पर्वणी लाभली. तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 20 व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. पंडित राम शंकर यांनी राग शुद्ध कल्याणने आपल्या…
