- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रविवार ( दि.१० ) पासून हरिनाम गजरात माउली मंदिरात प्रारंभ झाला. या निमित्त आळंदीत भाविकांना धार्मिक पर्वणी लाभणार आहे. यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा ७५० वा जन्मोत्सव असल्याने मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनातून प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होत आहे. श्रीकृष्ण व माऊली जन्मोत्सवा निमित्त आळंदी मंदिरात १० ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन-प्रवचन सेवा होत आहे. राज्यातील नामवंत कीर्तनकार-प्रवचनकार यांची सेवा तसेच गाथा भजन आदी सुश्राव्य सेवा आळंदीत…
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव ज्ञानाष्टमी, श्री कृष्ण जन्मोत्सव गोकुळाष्टमी निमित्त आळंदी माऊली मंदिरात प्रवचन, गाथा भजन. कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन १० ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत प्रथा परंपरांचे पालन करीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. विविध कार्यक्रमात पहिल्या दिवशी रविवारी ( दि.१० ) विश्वस्त ह भ प चैतन्य महाराज कबीर यांचे प्रवचन, ह भ प शंकर महाराज बडवे यांचे कीर्तन हरिनाम गजरात झाले. ११ ऑगस्ट रोजी रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प डॉ. नारायण महाराज जाधव यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० वारकरी शिक्षण…
महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा पुढाकार ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाकरिता मूर्ती सुपूर्द पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासह श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चे स्वर आता थेट बेल्जियम मध्ये देखील निनादणार आहेत. महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियम मध्ये दरवर्षी साज-या होणा-या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती पुण्यातील मंदिरात विधीवत पूजन करुन नुकतीच महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, रोहित लोंढे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांचे सहकारी मच्छिंद्र काटे,राहुल काटे,हर्षल काटे,सचिन झिंजुर्डे, प्रतीक काटे, श्रेयस काटे, संतोष काटे, उदय माझीरे, ओंकार काटे, भूषण काटे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे देणगी जमा केली. येत्या 15 ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिराला 22 किलो सोन्याचा सुवर्णकलश बसवण्यात येणार आहे. यावेळी हि देणगी नाना काटे यांच्या हस्ते संस्थान चे विश्वस्त ह.भ.प.पुरुषोत्तमदादा पाटील यांना सुपूर्त करण्यात आली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिषेक करून मनोभावे दर्शन घेऊन नानांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सहभागी झाले होते. राजशिष्टाचारानुसार या मोर्चाला सामोरे जाण्याची नैतिक जबाबदारी आयुक्त शेखर सिंह यांची होती. परंतु आयुक्त सिंह अथवा अतिरिक्त आयुक्त देखील या मोर्चाला सामोरे गेले नाहीत. आयुक्तांची ही वर्तणूक राजशिष्टाचार पायदळी तुडवणारी आहे, तसेच आण्णा बनसोडे हे अनुसूचित जाती, जमाती समाजाचे प्रतिनिधी असल्यामुळे आयुक्तांनी मोर्चाला सामोरे जाण्याचे टाळले याचा निषेध करण्यासाठी आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यासाठी दलित अत्याचार प्रतिबंधक कृती समिती, पिंपरी चिंचवडच्या वतीने आज (दि. ११ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता, पिंपरी…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची माननीय न्यायालयामार्फत निर्दोष मुक्तता झाल्यानंतर या खटल्यामागील तथाकथित “भगवा आतंकवाद” ही संकल्पना पुन्हा एकदा जनतेसमोर चर्चेचा विषय बनली आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता एका विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतीत मालेगाव खटल्यातील आरोपातून मुक्त झालेले समीर कुलकर्णी सहभागी होणार असून, ज्येष्ठ पत्रकार आणि अॅनेलायझर न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी तसेच इतिहास संशोधक डॉ. श्रमिक गोजमगुंडे त्यांची मुलाखत घेणार आहेत. कार्यक्रमात समीर कुलकर्णी आपल्या दीर्घ तुरुंगवासातील अनुभव, खटल्यामागील राजकीय आणि सामाजिक षड्यंत्र, आणि भगव्याला आतंकवादाचे रूप देण्याच्या प्रयत्नांचा सखोल उहापोह…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभूव्याख्याते बालाजी काशिद यांच्या “मी गड बोलतोय” या ऐतिहासिक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे.( ज्येष्ठ इतिहास संशोधक), आनंद पिंपळकर (प्रसिद्ध वास्तूशस्त्र तज्ञ), डॉ. लवनीश त्यागी (प्रमुख संचेती हॉस्पिटल पुणे), संजय पासलकर(अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे ), मारुती गोळे(दुर्ग अभ्यासक), सुनील रासने(अध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ). महेश सूर्यवंशी (खजिनदार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट), अक्षय आबनावे(अध्यक्ष शिवशंभू प्रतिष्ठान हडपसर पुणे),श्री अनिल (बापू) जेधे( अध्यक्ष शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे) अनेक मान्यवर उपस्थित होते..यावेळी मी गड बोलतोय या पुस्तकाची थोडक्यात प्रस्तावना लेखक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनेच्या वतीने निगडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. छत्री वाटपामागील आदर युक्त भावना आणि आमचा केलेला विचार यामुळे आम्ही हरकून गेलो अशा प्रतिक्रिया यावेळी जेष्ठ नागरिकांनी दिल्या. प्रत्येक घटकाचा विचार आणि प्रत्येकाला आदर हीच शिवसेनेची ओळख आहे असे यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, शिवसेना खासदार, शिवसेना उपनेते श्रीरंग आप्पा बारणे व शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी यांच्या नेतृत्वाखालीप्रभाग क्र. १३ यमुनानगर निगडी सेक्टर २२ येथील जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराची वाढणारी लोकसंख्या पाहता निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते किवळे, मुकाई चौक, वाकड (हिंजवडी मेट्रो स्टेशन), पिंपळे सौदागर ते चाकण पर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यामुळे या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. डीपीआर पूर्ण करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली. खासदार बारणे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखलीतील घरकुल परिसरात सलग १५ ते १६ तास वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे नागरिकांचे रोजचे जीवन विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात मारुती जाधव, अध्यक्ष – जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान घरकुल, यांनी आकुर्डी विभागाचे विद्युत अभियंता जाधव साहेब यांच्याकडे लेखी निवेदन देत तक्रार नोंदवली. जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घरकुल चिखली परिसरातील वीजपुरवठा वारंवार आणि दीर्घकाळासाठी खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, महावितरण विभागाचे कर्मचारी याबाबत कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. घरकुल परिसरासह महात्मा फुले नगर, शरदनगर, पूर्णानगर, कृष्णानगर, अजंठा…
