ताज्या घडामोडीपिंपरी

आळंदीत माऊली जन्मोत्सव सोहळ्यास हरिनाम गजरात प्रारंभ गोकुळाष्टमी सप्ताहात भाविकांना धार्मिक पर्वणी

कोट्यावधी रुपये देणगीतून सुवर्णकलश होणार लोकार्पण

Spread the love

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रविवार ( दि.१० ) पासून हरिनाम गजरात माउली मंदिरात प्रारंभ झाला. या निमित्त आळंदीत भाविकांना धार्मिक पर्वणी लाभणार आहे. यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा ७५० वा जन्मोत्सव असल्याने मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनातून प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होत आहे.

श्रीकृष्ण व माऊली जन्मोत्सवा निमित्त आळंदी मंदिरात १० ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन-प्रवचन सेवा होत आहे. राज्यातील नामवंत कीर्तनकार-प्रवचनकार यांची सेवा तसेच गाथा भजन आदी सुश्राव्य सेवा आळंदीत रुजू होत आहेत. श्रींचे जन्मोत्सवात गाथा पूजन व आरती आळंदी देवस्थानचे वतीने झाली. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, राजाभाऊ चौधरी, माऊली निंबाळकर, श्रीधर सरनाईक आदी उपस्थित होते. मंदिरातील धार्मिक महत्त्व लक्षात घेत आळंदी देवस्थानने कार्यक्रम आणि माऊली मंदिरात विद्युत रोषणाईसह पुष्प सजावट देखील गोकुळाष्टमी दिनी करण्याची तयारी केली आहे. मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई झाल्याचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. यावर्षी १५ ऑगस्ट रोजी श्रींचे मंदिरात शिखरावर ११ किलो वजनाचा सुवर्ण कलश बसविण्यात येणार आहे. यासाठी भाविकांच्या देणगीचा ओघ सुरु असून भाविकांनी सढळ हाताने सोने वस्तू, रोख रक्कम देण्याचे आवाहन देवस्थानने केले आहे. यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध देणगीदारांत डॉ. इंदिरा पारखे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंडी ट्रस्टचे अध्यक्ष ऍड विष्णू तापकीर, स्वकाम सेवा मंडळ, अमर गायकवाड, योगीराज कुऱ्हाडे पाटील, मीरा भोसले आदिचनहां समावेश आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. सप्ताहाचे काळात मंदिरात दुपारी चार ते पाच दरम्यान प्रवचन सेवा, माऊली जन्मोत्सवात प्रवचन, कीर्तन सेवा हरिनाम गजरात होत आहे. राज्यातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार सेवा रुजू करतात. या सप्ताहात आळंदीकर भाविक,नागरिकांना श्रवण सुखाची पर्वणी लाभणार आहे.

श्रींचा जन्मोत्सव दिनी पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना पवमान अभिषेक पूजा, दुधारती, ११ ब्रम्ह्व्रुन्दाचा वेदघोष अभिषेक होणार आहे. आळंदी देवस्थान तर्फे श्रीची गोकुळ पूजा होईल. त्यानंतर वंशपरंपरेने मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरिजागर सेवा होईल. श्रीचे जन्मोत्सव प्रसंगी पुष्पवृष्टी, आरती, सुंठवडा प्रसाद, उपवासाची खिरापत, मानकरी, सेवक, यांना नारळ प्रसाद वाटप प्रथा परंपरेने वाटप होत आहे. काल्याचे कीर्तन सेवेने जन्मोत्सवाची सांगता होणार आहे. आळंदी मंदिरातील परंपरांचे पालन करीत श्रींचे जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीची मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. माऊली मंदिरातून पंढरपूर येथील वारकरी तसेच महिन्याचे वारकरी आदींना निमंत्रण देण्यात आले आहे.

गोकुळाष्टमी सप्ताहासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, विश्वस्त आणि सेवक कर्मचारी, आळंदीकर ग्रामस्थ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, संस्थानचे सेवक मानकरी, कर्मचारी वृंद भाविक,नागरिक यांचे माध्यमातून तयारीसह नियोजन केले जात आहे. या जन्मोत्सवातील विविध धार्मिक उपक्रमात भाविक, नागरिकांनी सहभागी वाहावे असे आवाहन आळंदी देवस्थानने केले आहे. आता पर्यंत मोठ्या प्रमाणात सोने आणि काही कोटी रुपये जमा झाले असून भाविकांनी आळंदी देवस्थान ला सुवर्ण कलश उपक्रमास मदत करावी असे आवाहन आळंदी देवस्थानने सोशल मीडियाद्वारे केले आहे.

कृष्ण जन्माष्टमी हा एक प्रसिद्ध हिंदू सण आहे. जो भगवान कृष्णाच्या पूजेला समर्पित आहे, त्यांचा जन्मोत्सव देशासह परदेशातही साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी दिनी श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव ( ज्ञानाष्टमी ) आळंदीत देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सप्ताहात राज्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राज्य शासनाचे माध्यमातून देखील होत आहेत. यात गावागावांसह शहरात श्रींचे प्रतिमा, साहित्य, ग्रंथ पालखी मिरवणूक, पसायदानाचा वाचन राज्यातील शाळाशाळांतून होणार आहे. सर्वानी या पवित्र उत्सवात सहभागी होऊन आपण आपापल्या भागात परिसरात उपक्रमांचे आयोजन करून सहभागी व्हावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे वाटणे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले आहे. या काळात संत साहित्याचा प्रचार प्रसार होऊन घरा घरात हरिपाठ, ज्ञानेश्वरी साहित्य पोहोचावे यासाठी या ज्ञानयज्ञात सर्वानी सहभागी व्हावे. असे आवाहन काळे यांनी केले आहे.

स्वकाम तर्फे सुवर्ण कलश उपक्रमास २ लाख, २१ हजार, ७५१ रुपये देणगी
स्वकाम सेवा मंडळ आळंदी यांचे तर्फे श्रींचे सुवर्ण कलश उपक्रमास २ लाख, २१ हजार, ७५१ रुपये देणगी अध्यक्ष श्री सुनील ज्ञानेश्वर तापकीर यांचे हस्ते आळंदी देवस्थानचे विश्वस्त निलेश लोंढे महाराज यांचे यांचे कडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक आणि आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. सारंग जोशी, महिला विंग अध्यक्षा आशा तापकीर यांचेसह स्वकाम सेवा मंडळाचे मान्यवर पदाधिकारी स्वकाम सेवक, महिला, पुरुष आदी उपस्थित होते. यावेळी देवस्थान विश्वस्त निलेश महाराज लोंढे यांनी स्वकम सेवा मंडळाचे पदाधिकारी यांचा देणगी स्वीकृत करून स्वकाम सेवा मंडळास माऊलींची प्रतिमा आणि मान्यवरांना उपरणे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. स्वकाम सेवा मंडळ राज्यातील मंदिरांत जाऊन विविध प्रसंगी स्वच्छता, अमृत सेवा उपक्रम राबवित राज्यातील मंदिरांत सेवा रुजू करीत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button