माऊलींचा जन्मोत्सव सोहळा ज्ञानाष्टमी ; गोकुळाष्टमी धार्मिक पर्वणी आळंदीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव ज्ञानाष्टमी, श्री कृष्ण जन्मोत्सव गोकुळाष्टमी निमित्त आळंदी माऊली मंदिरात प्रवचन, गाथा भजन. कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन १० ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत प्रथा परंपरांचे पालन करीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
विविध कार्यक्रमात पहिल्या दिवशी रविवारी ( दि.१० ) विश्वस्त ह भ प चैतन्य महाराज कबीर यांचे प्रवचन, ह भ प शंकर महाराज बडवे यांचे कीर्तन हरिनाम गजरात झाले.
११ ऑगस्ट रोजी रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प डॉ. नारायण महाराज जाधव यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे कीर्तन होईल. १२ ऑगस्ट रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प गोविंद महाराज गोरे यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० ह भ प पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन होणार आहे. १३ ऑगस्ट रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प रमेश आप्पा महाराज यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष ह भ प बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन होणार आहे.
१४ ऑगस्ट रोजी दु.४ ते सायं ५ साधक आश्रम यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० ह भ प चिन्मय महाराज सातारकर यांचे कीर्तन, १५ ऑगस्ट रोजी दु.४ ते सायं ५ योगी निरंजनाथ यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होईल. १६ ऑगस्ट रोजी ९ ते ११ ह भ प बापूसाहेब मोरे देहूकर यांचे काल्याचे कीर्तनाने जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होईल. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे यांचे तर्फे भाविकांना महाप्रसाद अन्नदान सेवा होणार आहे. या सप्ताहात सर्व भाविक, नागरिकांनी धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.








