Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आज विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अपमानाविरुद्ध महामोर्चा आणि निषेध सभेचे आयोजन
ताज्या घडामोडी

आज विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अपमानाविरुद्ध महामोर्चा आणि निषेध सभेचे आयोजन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 August 2025Updated:11 August 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सहभागी झाले होते. राजशिष्टाचारानुसार या मोर्चाला सामोरे जाण्याची नैतिक जबाबदारी आयुक्त शेखर सिंह यांची होती. परंतु आयुक्त सिंह अथवा अतिरिक्त आयुक्त देखील या मोर्चाला सामोरे गेले नाहीत. आयुक्तांची ही वर्तणूक राजशिष्टाचार पायदळी तुडवणारी आहे, तसेच आण्णा बनसोडे हे अनुसूचित जाती, जमाती समाजाचे प्रतिनिधी असल्यामुळे आयुक्तांनी मोर्चाला सामोरे जाण्याचे टाळले याचा निषेध करण्यासाठी आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यासाठी दलित अत्याचार प्रतिबंधक कृती समिती, पिंपरी चिंचवडच्या वतीने आज (दि. ११ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता, पिंपरी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.

रविवारी पिंपरी चिंचवड येथे शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या प्रतिनिधींची व दलित अत्याचार प्रतिबंधक कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये रिपब्लिकन नेते सुरेश निकाळजे, कष्टकऱ्यांच्या नेते बाबा कांबळे, रिपब्लिकन नेते राहुल डंबाळे, बाळासाहेब रोकडे, संतोष निसर्गंध, कुणाल वाव्हळकर, अजीज शेख, गोपाल तंतरपाळे, प्रमोद क्षीरसागर, सिकंदर सूर्यवंशी, अजय झुंबरे, योगेश भोसले, संजय शर्मा, रवींद्र ओव्हाळ, यश बोध, गंगा धेंडे, बळीराम काकडे, रमेश शिंदे, संतोष वाघमारे, चंद्रकांत बोचकुरे, प्रवीण वाघमारे, ॲड. नीलध्वज माने, पंकज वाघमारे, नजीर मुलाणी आदी या बैठकीमध्ये उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांचे हे कृत्य भारतीय संविधानाच्या कलम १४ (समता), कलम १५ (जातीच्या आधारावर भेदभाव प्रतिबंध) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत दंडनीय अपराध असून, आयुक्तांच्या जातीवादी मानसिकतेचे स्पष्ट द्योतक आहे अशी भावना पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील बहुजन मागासवर्गीय आणि कष्टकरी जनता अण्णा बनसोडे यांच्या अपमानाचा तीव्र निषेध करते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टी करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी या मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

उपेक्षित आणि वंचित समाजाचे नेतृत्व करीत असताना आण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावर काम केले आहे. तसेच पिंपरी येथून तिसऱ्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. आता महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष या संविधानिक पदावर काम पाहत आहेत. सामान्य कार्यकर्ता ते विधानसभेचे उपाध्यक्ष पद हा त्यांचा राजकीय प्रवास आंबेडकरी चळवळीतील जनतेला प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला सामोरे जाण्याचे ऐतसे कर्ज यांनी टाळले हा आंबेडकरी चळवळीचा आपण असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाची हमी दिली आहे. संविधानाचे राज्य असलेल्या या देशात, मागासवर्गीय व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्याची खंत आयुक्त सिंह यांच्या वर्तणुकीतून व्यक्त होते अशा आयुक्तांची हकालपट्टी झालीच पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरातील शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसमीर कुलकर्णी यांची चिंचवडमध्ये मंगळवारी जाहीर मुलाखत
Next Article माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त माउलींच्या मंदिराला देणगी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.