Author: maharashtrabreakingnews.com

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज गणेशोत्सवाचे स्वरूप पालटले आहे. अलीकडच्या काळात गणेशोत्सवाला नाविन्यपूर्ण महत्त्व आल्याचे पाहायला मिळते. यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही उल्लेखनीय गोष्ट आहे. डीजे’मुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे आगामी काळात यावर मार्ग कसा काढता येईल, याचा विचार गणेश मंडळांनी करावा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. दरम्यान, डोळसनाथ कॉलनीतील डोळसनाथ मित्र मंडळाला प्रथम क्रमांकाचा मंगलमूर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान, मावळ यांच्यावतीने गणेशोत्सवात गणपती मंडळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी सायंकाळी नाना नानी पार्क येथे संपन्न झाला.…

Read More

काळभोरनगरमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाची मागणी – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शादाब खान यांचे उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन” पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १४ मधील सोपानराव विष्णू काळभोर माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शादाब आलाभाई खान यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे केली आहे. या निवेदनामध्ये त्यांनी प्रभागातील सोपानराव विष्णू काळभोर माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, इयत्ता अकरावी व बारावीचे देखील सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे. खान यांनी आपल्या…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना कसबा विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी प्रणव पैठणकर यांची; तर पुणे शहर प्रमुखपदी समीर नाईक यांची, सचिन नाईक ऍड. नितीन भंडारे यांची उपशहर प्रमुखपदी, अरुण चोरमले यांची कोथरूड विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रणव पैठणकर हे उच्चशिक्षित विद्युत अभियंता असून, हे या मतदार संघामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध प्रश्नांवर गेले अनेक वर्ष कार्य करत असून, या कार्याची दखल पक्षाने घेतली आहे. भविष्यात या मतदार संघामध्ये शिवसेना पक्ष बांधणी व पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद पेटला असून, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पडळकर यांनी तात्काळ माफी न मागितल्यास त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. सहकार महर्षी स्व. राजाराम पाटील सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी व कामगार वर्गाला आर्थिक बळकटी दिली. शिक्षण, सहकार व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्य वाहून घेतले. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून जयंत पाटील साहेब हे सत्यनिष्ठा, अभ्यासू वृत्ती व प्रामाणिक नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार परंपरेचे खरे वारसदार ठरले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –    भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा यांच्या वतीने (गुरुवार, दिनांक १८) ग. दि. माडगूळकर सभागृह, पेठ क्रमांक २६, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वीर गौरव सेनानी सन्मान सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सेवानिवृत्त ब्रिगेडियर इंदरमोहन सिंह, सेवानिवृत्त सार्जंट गोपाल वानखेडे, सेवानिवृत्त ब्रिगेडियर एच. के. दडित, सेवानिवृत्त कर्नल व्ही. व्ही. वेसावीकर, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सलीम शिकलगार, अरुण थोरात, भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महाडिक, मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी, मानद कोषाध्यक्ष मारुती भराटे, सोहळ्याचे मुख्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे म्हणजे साहित्य कला क्षेत्राचे उगमस्थान अशी ओळख आहे. पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडची ओळख औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवामुळे या शहराची ओळख कला विश्वातही अग्रस्थानी घेतली जाईल.‌ महापालिकेने महोत्सवाला भरीव मदत करून शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना दिली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉ.‌ जब्बार पटेल यांनी केले. पुढील वर्षी महोत्सव पाच दिवसांचा असावा, अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या जनहितकारी योजना आणि भाजपच्या राष्ट्रव्यापी अभियानांची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी ‘सेवा पंधरवडा’, ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’ आणि नुकत्याच जाहीर झालेल्या जीएसटी दरांमधील कपातीबद्दल सविस्तर माहिती दिली. पिंपरी येथील हॉटेल घरोंदा, मोरवाडी येथे आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्यासह आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, माजी उपमहापौर…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  उदयन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी नाट्यमहोत्सवातून संधी मिळाली आहे. पिंपरी चिंचवड शहराची आता सांस्कृतिक ओळखही निर्माण झाली असून अनेक कवी, लेखक, साहित्यिक, अभिनेते घडले आणि घडत राहतील. यामुळे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. सरकार म्हणून सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्राला शक्यतो सर्व मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या महोत्सवाला मदत करून कला, संस्कृती जोपासण्यास हातभार लावला आहे, असे मत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव…

Read More

अजितदादांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या जनसंवादात ४,८०० तक्रारींची नोंद पिंपरी जनसंवादात पाणीपुरवठा, स्वच्छता व वाहतूक यांवर नागरिकांचा भर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे आज जनसंवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले. हडपसरमधील यशस्वी जनसंवादानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रव काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत दुसऱ्या जनसंवाद उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हडपसरप्रमाणेच पिंपरी येथील जनसंवादातही नागरिक, विविध शासकीय विभाग आ लोकप्रतिनिधी एकत्र आले. या उपक्रमासाठी डिजिटल हेल्पलाईन, व्हॉट्सअप चॅटबॉ डिजिटल किऑस्कसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरात आणले गेले, ज्यामुळे पारदर्शकता आ उत्तरदायित्त्व निश्चित झाले. आजच्या कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त शासकीय विभागांनी सहभाग घेतला. एकूण ४,८ तक्रारींची नोंद झाली असून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पथारी, हातगाडी, स्टॉलधारक, फेरीवाला यांच्यासाठी सुसज्ज असा आणि राज्यात आदर्श ठरेल असा सुनियोजित हॉकर्स पार्क पंचशील फाउंडेशन तर्फे पुणे शहरात बनवण्यात आला आहे, याची महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे शिष्टमंडळ व पथ विक्रेता समिती सदस्यांनी आज पाहणी केली. नवीन संकल्पनेतून हॉकर्स पार्क पिंपरी चिंचवड मध्ये साकारण्यासाठी महासंघ आणि समिती सदस्य प्रयत्न करतील असा विश्वास कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, लाला राठोड यांचे सह राजेश माने, सलीम शेख,ओमप्रकाश मोरया, उपस्थित होते. पुणे खराडी येथे पथ…

Read More