शिवसेना कसबा विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी प्रणव पैठणकर यांची नियुक्ती
शिवसेना शिंदे गटाच्या शहर पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना कसबा विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी प्रणव पैठणकर यांची; तर पुणे शहर प्रमुखपदी समीर नाईक यांची, सचिन नाईक ऍड. नितीन भंडारे यांची उपशहर प्रमुखपदी, अरुण चोरमले यांची कोथरूड विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या.
प्रणव पैठणकर हे उच्चशिक्षित विद्युत अभियंता असून, हे या मतदार संघामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध प्रश्नांवर गेले अनेक वर्ष कार्य करत असून, या कार्याची दखल पक्षाने घेतली आहे. भविष्यात या मतदार संघामध्ये शिवसेना पक्ष बांधणी व पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुलजी कनाल, उपराज्य प्रमुख प्रतिक शर्मा, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवदे, पुणे जिल्हा प्रमुख मंगेश सिसोदे यांनी नियुक्ती झालेल्या सर्वांना शुभेच्छा देत पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.













