ताज्या घडामोडीपिंपरी

मानवतेचा, शांतीचा आणि बंधुभावाचा संदेश देत हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  यंदाच्या गणेश उत्सवात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती व गणेश उत्सव एकत्र आल्यामुळे पिंपरी चिंचवड जुलूस समितीच्या व पोलीस विभागाच्या वतीने झालेल्या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आज साजरी करण्याची ठरले त्याप्रमाणे आज पिंपरी चिंचवड जुलूस समितीच्या वतीने तसेच इतर मशिदी , मदरसे च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात मोहम्मद पैगंबर याच्या १५०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात ईद – ए – मिलाद उत्साह ,भक्तीभाव आणि ऐक्याच्या वातावरणात साजरी झाली.

पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत काढलेल्या भव्य मिरवणुकीत लहानग्या चिमुरडया निरागस मुले मुली ते वयोवृद्धांच्या श्रद्धेच्या नजरेपर्यंत सर्व रंग एकत्र मिसळलेले दिसून आले .

पिंपरी चिंचवड शहरात निगडी, भोसरी, काळेवाडी, कासारवाडी, काळा खडक ,नेहरूनगर ,ओटा स्कीम, आदी भागातून मोठया संख्येने मुस्लीम बांधव मिरवणुकीच्या द्वारे एकत्र पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येऊन मिरवणुकीची सांगता केली.आलेल्या सर्वाचे पिंपरी चिंचवड जुलूस समितीचे अध्यक्ष रमजान अत्तार , उपाध्यक्ष नासीर शेख , सचिव अकबर मुल्ला ,खजिनदार सलीम मेमन ,सदस्य व माजी अध्यक्ष युसूफ कुरेशी ,झिशांन सय्यद, हाजी गुलाम रसूल ,शहाजी अत्तार तसेच आदींनी स्वागत केले. पिंपरी येथे पिंपरी चिंचवड जुलूस समितीच्या वतीने बिहार येथील मुस्लीम धर्मगुरू हजरत अल्लामा मौल्लाना मुफ्ती शहरयार कादरी यांचे प्रवचन संपन्न झाले त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर विविध माहिती मुस्लिम बांधवांना दिली. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन मौलाना नय्यर नुरी यांनी तर आभार अध्यक्ष रमजान अत्तार यांनी मानले . यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व धर्मीय मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी मिलीद नगर येथील जामा मजीद व मदरसा लतेफिया चे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सचिव अकबर मुल्ला ,रियाज शेख , रज्जाक शेख ,मुस्तफा अहमद, हबीब शेख आदी मुस्लिम बांधवानी भव्य अली की तलवार चा देखावा सादर केला .
अनेक ठिकाणी , पाणी , शरबत , मिठाईचे वाटप करण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button