ताज्या घडामोडीधार्मिकपिंपरी

पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम- “लिहिते व्हा…” लेखिका माधुरी विधाटे

Spread the love

पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित
श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम “लिहिते व्हा…”
मालिकेचे नाव : चरित्रात्मक अभंग
भाग क्रमांक :- ६
वार : बुधवार, दिनांक : १० सप्टेंबर २०२५
प्रस्तुतकर्ता : सौ.माधुरी शिवाजी विधाटे

संत जनाबाई

पोरकी जनाई | दासी नामयाची |
होई विठ्ठलाची | धर्म लेक ||

निष्काम भक्तीचा | अंतरी उमाळा |
विठूचा जिव्हाळा | जीवनात ||

प्रेमे न्हाऊ घाली | करी वेणीफणी |
माऊली होऊनी | पांडुरंग ||

जनाईच्या दारी | भरतो रांजण |
दळण कांडण | करीतसे ||

सगुण भक्तीचे | लाभे पुण्यफळ |
वाहे परिमळ | केशवाचा ||

नाम संकीर्तनी | घेऊनीया बोध |
चालवला शोध | कैवल्याचा ||

ओवी अभंगांची | झरते वैखरी |
नाचतो श्रीहरी | शब्दातून ||

सबाह्य अंतरी | व्यापून राहीला |
विठ्ठल भेटला | जनाईला ||

सौ.माधुरी शिवाजी विधाटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button