ताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवडच्या श्री अग्रसेन ट्रस्टची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर

समाजहिताला अधिक प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा पदाधिकाऱ्यांचा संकल्प

Spread the love

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने आघाडी घेणाऱ्या श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवडची नवनिर्वाचित कार्यकारिणी (कार्यकाळ २०२५-२०२८) नुकतीच जाहीर झाली.

निवड प्रक्रिया पंच सदस्य कृष्णकुमार गोयल, रामअवतार अग्रवाल, वेदप्रकाश गुप्ता आणि डॉ. रमेश शिवनारायण बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

असे आहेत नवीन पदाधिकारी

अध्यक्ष – मोहन जे. गर्ग, कार्याध्यक्ष – विकास तरसेम गर्ग, उपाध्यक्ष – अशोक आर. अग्रवाल, सचिव – आशीष पी. गर्ग, सहसचिव पवन अग्रवाल, कोषाध्यक्ष – धर्मेंद्र जे. अग्रवाल, सहकोषाध्यक्ष – दिनेश अग्रवाल, भवन निर्माण समिती, अध्यक्ष – लाजपतराय मित्तल, उपाध्यक्ष नरेश एच. गुप्ता, भवन व्यवस्थापक – महावीर एम. बंसल, वैद्यकीय समिती – जगमोहन अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, सांस्कृतिक समिती अध्यक्ष – विकास गर्ग, उपाध्यक्ष, राजेश अग्रवाल, दिनेश अग्रवाल, आशिष गर्ग, मुख्य मार्गदर्शक – रमेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य – विनोद मित्तल.

समाजहिताला गती देण्याची जबाबदारी

या नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून समाजहित, सांस्कृतिक प्रगती आणि युवकांना प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांना नवे चैतन्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पंच समिती सदस्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

परंपरा आणि अपेक्षा

श्री अग्रसेन ट्रस्टने सदैव समाजात ऐक्य, सहयोग आणि सेवाभाव जपण्याचा वारसा पुढे नेला आहे. नव्या कार्यकारिणीमुळे समाजजीवनात सकारात्मक बदल आणि नवीन उर्जा निर्माण होईल, असा विश्वास समाजजनांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button