पिंपरी चिंचवड शहरात जन्म मृत्यू दाखल्याबाबत चाललेली नागरिकांची गैरसोय थांबवा – नाना काटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात जन्म मृत्यू दाखल्याबाबत चाललेली नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मनपा कार्यालयात जन्म मृत्यू दाखल्याची प्रत देण्याचे काम गेल्या एक महिनाभरापासून बंद आहे त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे मा. आयुक्त साहेब आपल्या महापालिकेच्या वतीने पूर्वी ज्या सॉफ्टवेअर मधून हे जन्म मृत्यू दाखले दिले जायचे ते सॉफ्टवेअर बंद झाले असून त्याजागी अत्याधुनिक नवीन सॉफ्टवेअर १५ दिवसापूर्वी घेण्यात आले आहे, परंतु ते सॉफ्टवेअर आजच्या तारखेपर्यंत बंद आहे का कशासाठी कुणाच्या फायद्यासाठी ? तसेच हे सॉफ्टवेअर हाताळायचे कसे, त्यात काम कसे करावे याचे ट्रेनिगं देखील संबंधित कर्मचारी वर्ग यांना अध्याप दिले गेलेले नाही, अश्या या कारणांमुळे नागरिकांना काही खासगी शासकीय, शैक्षणिक, कामासाठी लागणारे दाखले मिळत नसून नागरिक रोज आपल्या कार्यालयात हेलपाटे मारीत आहे व त्यांना आपले कर्मचारी सॉफ्टवेअर चालू झाले नाही, दाखले देणे बंद आहे उद्या या, परवा या, असे उत्तर देत आहेत.
विविध शासकीय योजना चालू झाल्या आहेत तसेच सध्या शैक्षणिक प्रवेशाचे दिवस चालू आहेत त्यासाठी नागरिकांना जन्म मृत्यू दाखला प्रत हे महत्वाचे असून, नागरिकांना ते गेल्या महिनाभरापासून मिळत हि खूप गंभीर बाब असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे
आपल्या महापालिकेच्या जन्म मृत्यू दाखल्याबाबत शहरात चालू असलेल्या नागरिकांची गैरसोय हेळसांड पाहता आपण यात वैयक्तिक या प्रकरणाकडे लक्ष घालून त्वरित नागरिकांना जन्म मृत्यू दाखले कसे मिळतील याचे प्रयोजन करावे, तसेच शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे असे ही निवेदनात म्हटले आहे.