
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी पत्रकार संघ, मावळ तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी रामदास वाडेकर, कार्याध्यक्षपदी अतुल पवार सचिवपदी गणेश विनोदे आणि यांची निवड करण्यात आली. तसेच सुदेश गिरमे यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा वडगाव मावळ येथे उत्साहात पार पडला.
संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार प्रमुख उपस्थित होते. यावेळी संघाचे सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, कामशेत पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे, लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन तिकोने, पवनानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी ठाकर आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी पत्रकार तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. तसेच पत्रकार बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबत मार्गदर्शन केले. विवेक इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले, तर सुदेश गिरमे यांनी संघाच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा मांडला.
तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, बबनराव भसे, सोनबा गोपाळे, ज्ञानेश्वर वाघमारे, विवेक इनामदार आणि निखिल कविश्वर हे संघाचे सल्लागार आहेत.
यावेळी राधाकृष्ण येणारे, तात्यासाहेब धांडे, बाळासाहेब भालेकर, दिलीप कांबळे, ज्ञानेश्वर ठाकर, प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल घारे, निलेश ठाकर, संदीप गाडेकर, आकाश कानापुरम, महेश भागीवंत, श्रीकांत चेपे, राहुल सोनवणे, सोपान येवले, मंगेश आखाडे, चंद्रकांत असवले, नामदेव घरदाळे, अमित भागीवंत आदी उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष : रामदास वाडेकर
सचिव : गणेश विनोदे
कार्याध्यक्ष : अतुल पवार
उपाध्यक्ष : जगन्नाथ काळे, संकेत जगताप
सहसचिव : विशाल कुंभार
खजिनदार : नितीन तिकोने
प्रकल्पप्रमुख : विशाल विकारी, गणेश दुडम
कार्यकारिणी सदस्य : सचिन शिंदे, भारत काळे, बंडू येवले, रेश्मा फडतरे, अंकुश दाभाडे, प्रशांत पुराणिक, संजय हुलावळे, दक्ष काटकर, सुभाष भोते, माऊली वाघमारे.
पदसिद्ध कार्यकारिणी सदस्य : मनोहर दाभाडे, विलास भेगडे, रमेश कांबळे, सतीश गाडे, चेतन वाघमारे, रवी ठाकर.
“पत्रकार हा समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. पत्रकारांच्या प्रश्नांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचाही विचार झाला पाहिजे. त्यासाठी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासोबतच पत्रकारांच्या हिताच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मावळ तालुक्यातील नूतन कार्यकारिणीने एकजुटीने काम करून पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी सांगितले.
“मावळ तालुक्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन संघाची एकजूट अधिक मजबूत करण्याला प्राधान्य देणार आहे. पत्रकारांच्या व्यावसायिक प्रश्नांसोबतच आरोग्य, कुटुंबीयांचे हित आणि सामाजिक बांधिलकी या बाबींवरही काम केले जाईल. सर्वांच्या सहकार्याने पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचा आणि संघाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करू,” असे नूतन अध्यक्ष रामदास वाडेकर यांनी सांगितले.
















