ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

संभाजीनगर शाहूनगर सोसायटी धारकांचा महायुतीच्या उमेदवारासाठी व मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मेळावा संपन्न

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर, शाहूनगर मोरवाडी माढा परिसरातील सोसायटी धारकांचा महामेळावा नुकताच “सीजन बँक्वेट” निगडी या ठिकाणी पार पडला. या मेळाव्याला सर्व सोसायटी धारक सभासद, चेअरमन व सेक्रेटरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली या मेळाव्याला संबोधन करताना भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी पंतप्रधान मोदी जी व श्रीरंग आप्पा बारणे यांची हॅट्ट्रिक करण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे खंबीर नेतृत्व असून परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या नेतृत्वावर आपण सर्वांनी राहणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

माजी महापौर मंगला कदम यांनी महायुतीमध्ये  अजित  पवार हे विकास कामे करण्यासाठी एकत्र आले असून त्यांच्याबरोबर राहणे आपली जबाबदारी आहे, व अजित दादांचे विकासाचे विजन यामुळे पिंपरी चिंचवड मधला विकास झाला असून महायुतीला आपण मतदान केले पाहिजे, म्हणून श्रीरंग आप्पा बारणे यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी श्रीरंग आप्पा बारणे यांच्या गेल्या दहा वर्षातील कामांचा पाढा वाचून दाखवला व श्रीरंग आप्पा मुळेच पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सारखी मोठे विषय मार्गी लावल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले.या वेळी उपस्थीत मा.नगसेवक तुषार हिंगे, मा.नगरसेवक केशव घोळवे, मा.नगसेविक अनुराधा ताई गोरखे,
भाजपाच्या नेत्या सुप्रिया चांदगुडे संदीप थोरात, मनसेच्या विद्या कुलकर्णी, राष्ट्रवादी युवती च्या वर्षा जगताप, भाजपच्या दिपाली करंजकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिवसेना पदाधिकारी विक्रम जानगुडे , राजेंद्र ढवळे,यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल राऊत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button