शिरुर मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटीबद्ध – शिवाजीराव आढळराव पाटील
महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ न्हावरा येथे सभा
शिरुर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर येथील न्हावरा येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून
सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत केले. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार प्रवीण दरेकर, जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष दौलत नाना शितोळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष रवीबापू काळे, जनता दल अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, माजी पंचायत समिती सभापती मंगलदास बांदल, राजेंद्र कोरेकर, खांडरे साहेब, एकनाथ शेलार, आबासाहेब सोनवणे, दिलीप हिंगे, गौतम कदम, अश्विनी कांबळे, शिवाजीराव कुऱ्हाडे, चेतनाताई पिंगळे, सपनाताई नलगुंडे, दादा पवार, मच्छिंद्र आण्णा बोदरे, किरण जाधव, प्रवीण गायकवाड, आमोल कांगुणे, रोहिणीताई शेंडगे, विनोद बोखाटे, रामभाऊ सासवडे, डाँ. सुभाष पोकळे, अनिल काशीद, राकेश गायकवाड आदी महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार प्रवीण दरेकर यावेळी बोलताना म्हणाले, “अभिनेता हा फक्त अभिनय करु शकतो, पण नेता हा अभिनय नाही करु शकत. तो करतो समाजकारण व विकासाचे राजकारण. आपले आढळराव पाटील हे समाजकारण व विकासाचे राजकारण करतात. समोरच्या विरोधी उमेदवाराने कुठल्याही गावात येऊन त्यांनी काय कामे केली ती सांगावीत. त्यांचा 80 टक्के सरकारी निधी न वापरल्याने परत गेला आहे.विरोधी उमेदवाराने कुठलीही विकासकामे केली नाहीत. हा कुठल्या तोंडाने मतदारसंघात फिरतो आहे. आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या विकासरथाला आपल्याला साथ द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला शिरुर लोकसभा मतदार संघातून आपले महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना 2 लाखांच्या मताधिक्याने विजयी करायचे आहे. त्यांचे चिन्ह घड्याळ हे आहे. त्यासमोरील बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करायचे आहे.”
दरम्यान, यावेळी बोलताना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,”ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत आदरणीय विकासपुरुष नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात. राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त आदरणीय मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मागील 10 वर्षांत अनेक विकासकामे देशात झाली आहेत. गेल्या निवडणूकीत मी पराभूत होऊनही मी पायाला भिंगरी लावून फिरलो, मोठा निधी मतदार संघात आणला आहे. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. मोदीजी यांच्या विचाराचा पुर्णवेळ खासदार आपल्याला विजयी करायचा आहे. कोरोना काळात मी जीवाची पर्वा न करता माझ्या मतदार संघातील नागरिकांना आधार देण्याचे काम केले. 2014-15 च्या दरम्यान आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू आणि तुळापूर येथे करण्याचा 140 कोटींचा विकास आराखडा सादर केला. आमचा पराभव झाला परंतू तरीही आम्ही प्रयत्न सुरुच ठेवले. 400 कोटींचा विकास आराखडा मंजूर करुन घेतला. आता त्याचे कामही सुरु झाले आहे. माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर आपल्याला सत्तेमधील खासदार निवडून द्यावा लागेल. समोरचा विद्यमान खासदार याने पाच वर्षांत कुठलेही काम केले नाही. हक्काचा निधी या निष्क्रिय खासदारामुळे परत गेला आहे. सध्या माझ्यावर खोटारडे आरोप केले जात आहेत. हे षडयंत्र एखादा बहुरुपीच करु शकतो. पण यावेळी जनता यांना भुलणार नाही.
लोकं मला आत्मियतेने सांगतात गेल्या वेळी आमची चूक झाली आता ती आम्ही दुरुस्त करु.
येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो.
यावेळी बोलताना मंगलदास बांदल म्हणाले, “आढळराव दादा पाटील मागील पाच वर्षे खासदार नसतानाही त्यांनी मतदार संघात भरघोस निधी आणला. मात्र विद्यमान खासदार हा पाच वर्षे मतदारसंघात फिरकलेही नाहीत. त्यांनी मतदारसंघात विकासकामे केली नाहीत, फक्त बोलबच्चनगिरी केली. मोदीजी यांच्यामुळे आज देशाबाहेरही भारताची पत वाढली आहे. छत्रपतींच्या वाघनख्या आणल्या हे फक्त मोदीजींमुळे शक्य झाले. मोदीजी हे विकासपुरुष आहेत. त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आढळराव दादा यांना निवडून आणणे गरजेचे आहे.”
राजेंद्र कोरेकर म्हणाले, आढळराव दादा पाटील यांच्या माध्यमातून 160 कोटींचा न्हावरे रस्ता मंत्री गडकरी साहेब व मोदीजी यांचा पाठपुरावा करुन हा त्यांनी मंजूर करुन घेतला. हा दूरदृष्टी असलेला नेता आहे. अजित दादा व शिवाजी दादा जर सोबत असतील तर आपल्या परिसराचा सर्वांगिण विकास होईल.
दौलतनाना शितोळे म्हणाले, “रामोशी समाज बांधवांच्या मोठ्या समस्या आहेत. आढळराव दादा कायमच समाजाच्या पाठीशी राहिले आहेत. शिवाजी दादा यांना खासदार करायचे आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करु.” सभेला महिला व तरुणांची संख्या मोठी होती. मोठ्या उत्साहाने गावकऱ्यांनी दादांचे स्वागत केले.