Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२४ चे आयोजन
ताज्या घडामोडी

महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२४ चे आयोजन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 April 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारकाशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.४५ वाजता प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रबोधन पर्वात महानाट्य, लाईव्ह कॉन्सर्ट, गीत गायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, मतदान जनजागृती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधन पर्वात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

गुरुवार दि.११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी यांच्या  गाथा महापुरुषांची या महामानवांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांच्या कार्यक्रमाने प्रबोधनपर्वास सुरूवात होणार आहे. सकाळी ११.३० वाजता उषा कांबळे  यांचा  महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दुपारी १२.३० वाजता मधुकर कदम आणि त्यांचे सहकारी पारंपारिक संगीत वाद्यातून महापुरुषांना अभिवादन तसेच मतदान जनजागृती कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय मोहड यांचा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले लिखित अखंडावर आधारित स्वर फुलोरा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.  सायंकाळी ५ वाजता धम्मा विंग्स, मुंबई प्रस्तुत जयभीम रॉक बॅण्ड या कार्यक्रमाद्वारे महापुरुषांना संगीतमय अभिवादन करण्यात येणार आहे.  सायंकाळी ७ वाजता राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गायक अमित जाधव यांच्या सूर क्रांतीचा आवाज महापुरुषांचा या संगीत-नृत्य-नाट्य-गीतांच्या अविष्काराने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता होईल.

शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता स्थानिक कलावंत महापुरुषांना गीतगायनातून मानवंदना देणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता ब्लू मून एंटरटेन्मेंट प्रस्तुत “कांबळेची वरात” हे समाज प्रबोधनपर धमाल विनोदी नाटक सादर होणार आहे. विजय गायकवाड या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक तर राजपाल वंजारी निर्माते आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता कुणाल बोदडे आणि सा.रे.ग.म.पा फेम रागिणी बोदडे यांची  वैचारिक गीतांची संगीतमय मैफिल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २.३०  वाजता सुप्रसिद्ध कव्वाल सुरज आतीश, विशाल वाकोडे, स्नेहल वानखेडे आणि सहकाऱ्यांचा प्रबुद्ध हो मानवा हा गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. सायंकाळी ४ वाजता काव्य संगीताद्वारे युगप्रवर्तकांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ गायक तथा कवी ललकार बाबु, नांदेड येथील मानकर बाबु कव्वाल, यवतमाळ येथील कमलेश पाटील, वर्धा येथील सुदेश कांबळे यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता संकल्प गोळे यांचा अभिवादनपर गीतगायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड गीतकार तथा शायर प्रणय सतलज यांचा विशेष सहभाग असणार आहे. रात्री ७ वाजता स्वरांचे बादशहा विजय सरतापे यांच्या प्रबोधनाची भीम सरगम या गीतगायनाच्या कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.

शनिवार  दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता स्थानिक कलावंतांचा महामानवांची प्रबोधनात्मक गौरवगाथा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळी ११.३० वाजता निर्माते तथा गायक कबीर नाईकनवरे यांचा संगीत आणि निवेदनातून प्रबोधनात्मक गीतांचा जलसा – सलाम संविधान हा कार्यक्रम सादर होणार आहे.  दुपारी १ वाजता ख्यातनाम लोकगायिका कडूबाई खरात यांचा गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता प्रसिद्ध गझलकार अशोक गायकवाड यांची रथ भीमाचा हा नेऊ पुढे ही गझल गीतांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता स्वरांगण दृष्टीहीन संस्थेतील अंध कलाकारांतर्फे जिनिअस स्टार्स हा गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भारत लोणारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध संगीतकार, सिनेपार्श्वगायक, निवेदक, अभिनेते अवधूत गुप्ते यांच्या बहारदार भीमगीतांच्या कार्यक्रमाच्या  लाइव्ह कॉन्सर्टने तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.

प्रबोधनात्मक मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलमध्ये रोमिओ कांबळे, मुन्ना भालेराव, सागर येल्लाळे, संगीता भंडारे या कलाकारांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता सुधाकर वारभुवन, मारूती जकाते, सुमन चोपडे, सत्यभामा मस्के यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४.१५ वाजता गायक विशाल ओव्हाळ, धीरज वानखेडे, छाया कोकाटे, मिलिंद शिंदे यांचा महामानवांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सायंकाळी ६ वाजता एच.ए.मैदान, पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित १५० कलावंताचा सहभाग असलेले, राष्ट्रीय पातळीवर गाजलेले, तीन मजली अतिभव्य मंच असलेले, दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेले तसेच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले जतिन पाटील दिग्दर्शित काळजाचा ठाव घेणारी अप्रतिम कलाकृती – मूकनायक या महानाट्याने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईच्या गाळेधारकांनी घेतली मतदान करण्याची शपथ
Next Article मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु – वाघेरे पाटील
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.