

लहूजी वस्ताद साळवे जयंती व संविधान दिनानिमित्त
विकास अनाथ आश्रम व एम फोर सेवा बाल अनाथ आश्रम चिखली येथे शालेय साहित्य वाटप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आद्य क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंती निमित्त व संविधान दिनाचे औचित्य साधून विकास अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व वस्त्राचे वाटप करण्यात आले.
शालेय शैक्षणिक भेट वस्तू उपक्रम कै विलास आप्पा काळभोर प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ काळभोर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत अनाथ आश्रमातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मदत व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विक्रम गायकवाड, प्रीतम तेलंग, लहू उकरंडे, ओमकार तुपे, नारायण गायकवाड, संजय कदम, धीरज कांबळे, अतिश पात्रे, गुलाब झोंबाडे, राम लोंढे, अविनाश कसबे, रवी पवार, स्वप्नील कांटे, मोहित जाधव व अलोक पिरुमल कै.विलास आप्पा काळभोर प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ काळभोर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमातून सामाजिक एकता, सहकार्य, माणुसकी आणि गरजू मुलांना मदतीचा संदेश देण्यात आला.
अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळते आणि समाजातील सामाजिक जाणीव, माणुसकी व सहकार्याची भावना अधिक दृढ होते.



















