

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण, संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन, दोन नेत्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी वर्धापन दिन व संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुतळा, पिंपरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी माजी राष्ट्रवादी युवक सरचिटणीस सनी काळे व शिवसेना शाखाप्रमुख प्रदीप आहुजा यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी आम आदमी पार्टी शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, उपाध्यक्ष अशोक लांडगे, उपाध्यक्ष चंद्रमणी जावळे, उद्योग आघाडी अध्यक्ष सुरेश बावनकर, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष ॲडव्होकेट सुप्रिया गायकवाड, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष सुनंदा दुधाळ, भोसरी विधानसभा महिला उपाध्यक्ष शितल जेवळे, ओबीसी आघाडी अध्यक्ष राहुल मदने, युवा आघाडीचे शिवकुमार बनसोडे, सनी काळे, प्रदीप बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानाने दिलेले हक्क, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



















