
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या महिला अध्यक्ष व सविस्तर बातमी च्या संपादिका माधुरी समीर कोराड यांना पुरस्कार देऊन सन्मानित
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपला म्युझिकल ग्रुप” चा भाग 50 वा नुकताच आकुर्डी येथे ग.दि.माडगूळकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात साप्ताहिक सविस्तर बातमी व महान्यूजच्या संपादिका तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या महिला अध्यक्ष माधुरी समीर कोराड यांना विशेष पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार माधुरी समीर कोराड यांना याआधी देखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट पत्रकार,पत्रकार भूषण , युथ फीमेल जर्नालिस्ट आयकॉन, नारी शक्ती,उत्कृष्ट निवेदिका, तसेच कोरोना योद्धा,नवदुर्गा, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माधुरी कोराड या गेल्या सात-आठ वर्षापासून पिंपरी चिंचवड येथे आपल्या वृत्तपत्रातून व आपल्या चॅनेलच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडत असतात या सर्व बाबी लक्षात घेत आपला म्युझिकल ग्रुप च्या वतीने नुकताच आकुर्डी येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयोजक श्री. अनिल घाडगे यांनी माधुरी कोराड यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा सन्मान माननीय शर्मिलाताई बाबर उपमहापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योगिताताई नागरगोजे नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका व तुषार सहाणे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ पुणेरी पगडी सन्मान चिन्ह व गुलाबाचे वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.



















