
एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी मंडई हा उत्तम अनुभव – डॉ. कीर्ती धारवाडकर
एसबीपीआयएम येथे दिवाळी मंडई उद्योजक स्पर्धा संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एमबीए विद्यार्थ्यांसाठी दिवाळी मंडई हा उत्तम व्यावसायिक अनुभव आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, किंमत निर्धारण, विपणन, ग्राहक संवाद आणि विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन मिळते असे एसबीपीआयएम च्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे पाहिजे या उद्देशाने दिवाळी मंडई उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याचे उद्घाटन एसबीपीआयएम च्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. भूषण परदेशी, डॉ. स्वप्नील सोनकांबळे, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. इरम अन्सारी, डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. अमरीश पद्मा, डॉ. संतोष शिंदे, डॉ. विशाल वाघ, डॉ. दिलीप पवार, डॉ. पद्मलोचन बिसोई, डॉ. समीर ठाकूर आदी उपस्थित होते.
स्वागत, प्रास्ताविक करताना
समन्वयक डॉ. काजल महेश्वरी यांनी सांगितले की, व्यवसाय संकल्पनांची अंमलबजावणी संघ भावना नेतृत्व आणि निर्णय क्षमता यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच शाश्वत उत्पादने पर्यावरण पूरक पॅकेजिंग आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून बदलत्या व्यावसायिक संधींची ओळख होण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली. दिवाळी मंडई मुळे व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध झाले.
विद्यार्थी उद्योजकता स्पर्धेत विविध व्यवसायिक संकल्पना सादर केल्या. खाद्य पदार्थ, दिवाळी सजावट वस्तू व साहित्य, पर्यावरणपूरक उत्पादने, खेळ यांचा समावेश होता. पारंंपरिक पोशाखात सहभाग घेऊन विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उद्योजकला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंसहाय्यता गट उपक्रमात विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, हस्तकला वस्तू, पारंपारिक उत्पादने, सणासुदीच्या भेट वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश होता.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
बेस्ट सस्टेनेबल प्रॉडक्ट – टीम तेरा उत्सव; इनोवेशन इन सस्टेनेबल पॅकेजिंग – टीम दिवाळी बाईट्स;
इको फ्रेंडली दिवाळी डेकोरेशन – टीम फेस्टिव्ह बाजार; मोस्ट स्कॅलेबल बिजनेस मॉडेल – टीम फेस्टोरा; बेस्ट बिजनेस पीच – टीम शुभ लाभ; बेस्ट डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन फॉर अ सस्टेनेबल प्रोडक्ट – टीम दिवाळी नक्षत्र; बेस्ट डिजिटल प्रॉडक्ट डिझाईन फॉर सस्टेनेबल दिवाळी – टीम स्वदेस, तसेच मिस्टर इथनिक एलगन्स विजेता – आयुष देवकांत आणि मिस्टर इथनिक एलगन्स उपविजेता – प्रथमेश शेटे तसेच मिस इथनिक एलगन्स विजेती – रितिका माळी, मिस इथनिक एलगन्स उपविजेती – शुभदा बोरसे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आयोजनात समन्वयक म्हणून डॉ. काजल महेश्वरी, डॉ. अनिशकुमार कारिया, स्वाती सातपुते आदींनी सहभाग घेतला.
————————–



















