
अॅड. संजय भाऊसाहेब दातीर पाटील यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ‘शिस्तपालन समिती’ चेअरमन पदी निवड
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर पाटील यांना वकिली क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी आपल्या कारकिर्दीत न्यायव्यवस्था, वकील संघटना आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सन १९९४ मध्ये महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडून वकिलीची सनद प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायास सुरुवात केली. सन १९९६-९७ मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्षपद, तर सन २००६-०७ मध्ये अध्यक्षपद भूषविले.
वकिलांच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, बार असोसिएशनच्या संघटनात्मक कार्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. तसेच बार कौन्सिलच्या निवडणूक समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
सन २००५ पासून नोटरी व्यवसायात कार्यरत असताना त्यांनी बँका व पतसंस्थांना कायदेशीर सल्लागार म्हणून सुमारे ३० वर्षे सेवा दिली आहे. पिंपरी न्यायालय, त्यांनी यशस्वीपणे न्यायालयीन कामकाज केले आहे.
याशिवाय,पिंपरी चिंचवड ऍड. सोसायटी चे सचिव आहेत.पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे तज्ज्ञ संचालक सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
कोविड महामारीच्या कठीण काळात वकील वर्ग आणि गरजू नागरिकांसाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. तसेच पिंपरी-चिंचवड न्यायालयीन इमारतीच्या बांधकाम समितीचे सदस्य म्हणून न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या प्रदीर्घ विधी सेवेची, संघटनात्मक नेतृत्वाची, सामाजिक बांधिलकीची आणि न्यायव्यवस्थेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेऊन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल ने त्याना शिस्तपालन समिती चेअरमनपदी नियुक्ती करन्याय आली आहे.
या नियुक्ती मध्ये पिंपरी-चिंचवडच्या वकील वर्गात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून अॅड. संजय दातीर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



















