
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जबरदस्त अभिनय, बहारदार संवादफेक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे, तसेच नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करून सामाजिक बांधिकली जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज आकस्मिक निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नानांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली जाण्याने चित्रपटसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली.
नाना पाटेकर यांना गोव्यातील दोना पावला येथील घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र उपचारांदरम्यान पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
नाना पाटेकर यांचा अल्पपरिचय
१ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे जन्मलेल्या नाना पाटेकर यांचं पूर्ण नाव विश्वनाथ गजानन पाटेकर असं होतं. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये ते नाना पाटेकर या नावाने परिचित झाले होते. व्यक्तिमत्त्वातील जरब, जबरदस्त संवादफेक या बळावर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेले चित्रपट
नाना पाटेकर यांनी मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. क्रांतिवीर, तिरंगा, प्रहार, यशवंत, अग्निसाक्षी, अब तक ५६, टॅक्सी नंबर ९२११, वेलकम अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. तसेच मराठीमध्येही सिंहासन, डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट, पक पक पकाक्, देऊळ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.
नाना पाटेकर यांना मिळवलेले पुरस्कार
नाना पाटेकर यांना त्यांच्या अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच क्रांतिवीर चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तसेच परिंदा आणि अग्निसाक्षी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय नाना पाटेकर यांना सर्वोकृष्ट अभिनेता, सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोकृष्ट खलनायकासाठी फिल्मफेअर पुरस्कारा मिळाला होता.



















