
‘एज्युकेशन ४.०’ तंत्रज्ञानावर आधारित संशोधनाला विद्यापीठाची मान्यता
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माईर्स एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. महाविद्यालय, आळंदी (देवाची) येथील शिक्षणशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक संजय पोपट शिंदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे.
‘Programme Based on Education 4.0 Technology for Developing Technological Skills of Teacher Trainees’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी एज्युकेशन ४.० तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम विकसित करण्याच्या अनुषंगाने हे संशोधन करण्यात आले.
शिक्षणशास्त्र (आंतरविद्याशाखा) या विद्याशाखेतून त्यांनी हे संशोधन पूर्ण केले असून, डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
प्रा. संजय शिंदे हे बालपणापासून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाशी जोडलेले असून नियमित राजयोगाचा अभ्यास व साधना करतात.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, एमआयटी बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान निकुंभ, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

















